National Press Day 2022: काय आहे राष्ट्रीय पत्रकारिता दिवसाचा इतिहास...

in #yavatmal2 years ago

सर्वप्रथम हिकीचे 'बेंगॉल गॅझेट' हे साप्ताहिक इंग्रजी वृत्तपत्र कोलकात्यात 1780 साली सुरू झाले. त्यांंनीच भारतात पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. मराठीत बाळशास्त्री जांभेकर यांनी 21 जून 1832 मध्ये 'दर्पण' हे वृत्तपत्र सुरू केले. याच काळात हिंदी व अन्य भारतीय भाषांमध्ये अनेक वृत्तपत्रे सुरू झाली. भारतातील स्वतंत्र आणि जबाबदार पत्रकारितेचे प्रतीक म्हणून दरवर्षी 16 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा केला जातो. याच दिवशी प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाने (PCI) काम करण्यास सुरुवात केली.