हेल्थ वेल्थ : वजन कमी करताय? या चुका टाळा!

in #yavatmal2 years ago


Tuesday, November 15, 2022
AMP

ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

हेल्थ वेल्थ : वजन कमी करताय? या चुका टाळा!
Published on : 14 November 2022, 11:59 pm

By
सकाळ वृत्तसेवा
वजन कमी करणे हा फिटनेसचा सर्वांत महत्त्वाचा भाग झाला आहे आहे आणि त्यासाठी आज अनेक उपाय उपलब्ध आहेत.

  • विकास सिंह, संस्थापक, ‘फिटपेज’ ॲपवजन कमी करणे हा फिटनेसचा सर्वांत महत्त्वाचा भाग झाला आहे आहे आणि त्यासाठी आज अनेक उपाय उपलब्ध आहेत. यात वजन कमी करण्याचे वचन दिले जाते आणि लाखो लोक या उपयांमध्ये अडकलेले दिसतात. अधिक पर्याय न देता लोक वजन कमी करण्याच्या प्रवासात कोणत्या चुका करतात ते पाहू. आपल्याकडून त्या चुका होणार नाहीत याची काळजी घेऊ. पुरेसे न खाणे आपण विचार करतो, की आपण जे अन्न खातो त्याचे प्रमाण कमी केल्याने आपण आपले वजन वाढवून घेणार नाही आणि अतिरिक्त वजन कमी करू. त्यामुळे लोक सहजतेने त्यांचे अन्नसेवन कमी करण्याचा विचार करतात, परंतु ते सोपे नाही. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या संशोधकांनी सहा वर्षांत १४ माजी बिगेस्ट लूजर (अमेरिकन रिअॅलिटी शो) स्पर्धकांचा अभ्यास केला. सहभागींनी शोमध्ये कमी केलेले वजन परत मिळवले होते आणि काही प्रकरणांमध्ये, त्यांचे वजन आधीपेक्षा जास्त वाढले ​​होते. सर्वांचा रेस्टिंग मॅटॅबोलिक रेट विकसित झाला होता, तो ज्यांनी जलद वजन कमी केले नव्हते त्यांच्या तुलनेत खूपच कमी होता.दीर्घ कालावधीसाठी दैनंदिन कॅलरी एक हजाराच्या खाली नेण्याचा आणखी एक परिणाम म्हणजे निर्जलीकरण, रक्तातील साखरेची अनियमितता आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग. याव्यतिरिक्त, आपले मौल्यवान स्नायू ऊर्जा निर्मितीसाठी ब्रेक होऊ शकतात. तसेच, तुम्ही करू पाहत असलेल्या कोणत्याही कामगिरीच्या प्रगतीत अडथळा येऊ शकतो. वजन कमी करणे ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. सुरक्षितपणे वजन कमी करण्यासाठी तुम्हाला सर्व पोषक तत्त्वांची गरज आहे, म्हणून तुमच्या दैनंदिन कॅलरी फक्त तेवढ्या प्रमाणात कमी झाल्या पाहिजेत. यामुळे तुमच्या शरीराला आवश्यक असलेल्या पोषक तत्त्वांची कमतरता भासणार नाही.

वीकएण्ड सेलिब्रेशन नको!सोमवार ते शुक्रवार या पाच दिवशी योग्य आहार घेणे, नंतर शनिवार, रविवारी फास्ट फूड खाणे आणि दारू पिणे हे उपयोगाचे नाही. तुम्हाला फक्त आठवड्याच्या दिवसात तुम्ही फॉलो करत असलेल्या जीवनशैलीकडे लक्ष द्यायचे नाही, तर विकएण्डच्या अनावश्यक सवयी टाळण्याकडेही लक्ष दिले पाहिजे. अधूनमधून तुम्हाला आवडणारे काही पदार्थ खाणे ही चांगली गोष्ट असली, तरी नियमितपणे स्वतःला दोन दिवस जास्तीचे, अगणित खाल्ल्याने तुम्ही आठवडाभरात केलेली मेहनत वाया जाऊ शकते.पुरेशी प्रथिने न खाणेतुम्ही प्रथिने खाता, तेव्हा तुम्ही कार्बोहायड्रेट आणि चरबी खाण्याच्या तुलनेत तुम्हाला तुमचे पोट जास्त भरल्यासारखे वाटते. हे अतिरिक्त खाणे टाळण्यास आणि आपल्या आहारात अधिक कॅलरी आणण्यापासून दूर ठेवण्यास मदत करते. तुम्हाला दररोज १ ते १.२ ग्रॅम/किग्रॅ प्रथिनांची गरज असते. प्रत्येक मुख्य जेवणासाठी २० ते ३० ग्रॅम प्रथिने आणि स्नॅक्ससाठी ५-१० ग्रॅम प्रथिनांचे लक्ष्य ठेवा.टीव्ही पाहताना जेवण नकोजेवणे आणि गॅजेट्स वेगळे ठेवले पाहिजेत. आपण आवडती वेब सिरीज स्ट्रीम करत असताना, सोशल मीडिया ब्राऊज करताना किंवा टीव्ही बघत जेवताना गरजेपेक्षा जास्त खातो.काहीही फ्री नसतेप्रत्येक वेळी तुम्ही पॅक केलेल्या खाद्यपदार्थावर ‘फॅट-फ्री’, ‘शुगर-फ्री’ आणि ‘ग्लूटेन-फ्री’ यांसारख्या दाव्यांसह लेबल पाहता, तेव्हा सावध राहा. आपण हे पदार्थ आपल्यासाठी अधिक चांगले आहेत असे गृहीत धरतो, मात्र सहसा तसे नसते. उत्पादक पदार्थांमधून हे घटक काढून टाकतात, तेव्हा त्यांना चव वाढवण्यासाठी इतर गोष्टी घालाव्या लागतात. हे कृत्रिम गोड पदार्थ, मीठ, रसायने किंवा इतर मॅक्रोन्यूट्रिएंट्सच्या अतिरिक्त कॅलरीजच्या स्वरूपात येऊ शकते. हे पदार्थ अधिक निरोगी आहेत असे आपल्याला वाटते, म्हणून आपण अनेकदा जास्त प्रमाणात त्याचे सेवन करतो.तुम्ही कमी कॅलरी जाळता...तुम्ही अंदाजे किती कॅलरी बर्न करत आहात, हे जाणून घेण्यासाठी तुमच्या स्मार्टवॉचची मदत घेऊ शकता किंवा व्यायाम मशिन तपासू शकता. तथापि, सत्य हे आहे की आपण या उपकरणांमध्ये नमूद केलेल्यापेक्षा कमी कॅलरी बर्न करता. अभ्यासातून असे दिसून आले आहे, की अॅथलिट्स त्यांनी बर्न केलेल्या कॅलरींची संख्या सरासरी २८ टक्के जास्त मानतात. कॅलरी बॅलन्स साधा.
Web Title: Vikas Sinh Health Wealth Avoid These Mistakes While Losing Weight
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.
टॅग्स :Weight Lossdiet planWealthhealth
HomeHealthVikas Sinh Health Wealth Avoid These Mistakes While Losing Weight Pjp78

Careers
Ads Rate Card
Terms of services
Sakal Relief Fund
Esakal Android App
Agrowon
Saam TV
Sakal Printers
Sakal Publications
The Bridge Chronicle

Our History | Contact us | Advertise | Terms and Conditions | Privacy Policy
© 2000-2021 Sakal Media Group