आर्थिक स्वातंत्र्यासाठी‘फ्रीडम एसआयपी

in #yavatmal2 years ago

भारत आज अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहे. मात्र, लोकसंख्येतील मोठ्या गटाला अजूनही आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. एखादी व्यक्ती जी आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य आहे, असे मानले जाते जेव्हा तो किंवा ती जगण्याचे दैनंदिन खर्च भागवण्यासाठी कोणतेही काम न करता सक्षम आहे. अनेक अभ्यासांतून आणि आकडेवारीतून असे दिसून आले आहे, की जवळपास ५० टक्क्यांहून अधिक भारतीयांनी त्यांच्या निवृत्तीपश्चात आयुष्याबाबत कोणतेही नियोजन केलेले नाही.qwsedg678.jpg
घरगुती बचत मागील काही वर्षांत सातत्याने कमी होत आहे. ज्यामुळे, निवृत्तीकडे झुकणाऱ्या लोकसंख्येसाठी चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. जेव्हा दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट; जसे निवृत्तीनंतरचे जीवन पाहिले, तर त्यासाठी एक सातत्यपूर्ण उत्पन्न आवश्यक आहे. ज्यातून एखाद्याच्या आयुष्याचा उत्तरार्ध सुखकारक आणि आनंदमय होईल. जर अजूनही तुम्ही त्याचे नियोजन केले नसेल तर तुम्हाला काही अनपेक्षित नकारात्मक घटनांना सामोरे जावे लागू शकते, ज्यामुळे तुमचे नियोजन कोलमडू शकते. त्यामुळेच अशा क्लिष्ट उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडासारख्या कंपनीने ‘फ्रीडम एसआयपी’ ही योजना सादर केली आहे.