ठाकरे गटाचा नेता भाजपाच्या गळाला; माजी आमदार करणार पक्षात प्रवेश

in #yavatmal2 years ago

Image Credit Source: TV9

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून (Shiv sena) उठाव केल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. आतापर्यंत अनेक नेते, आमदार, खासदार, शिवसेनेचे पदाधिकारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट दोघांनीही धनुष्यबाण या चिन्हावर दावा केल्यानं चिन्ह देखील गोठवण्यात आलं आहे. आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. मात्र यावेळी एकनाथ शिंदे यांनी नाही तर भाजपाने धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार अवधूत तटकरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला लागलेली गळती रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र दुसरीकडे नेत्यांचे शिंदे गट आणि भाजपात प्रवेश सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे

udhav-thackrey.jpg