“माझा भाऊ कॉप्या करुन…”; मुख्यमंत्री शिंदेंचा ‘ढ’ असा उल्लेख करत सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

in #yavatmal2 years ago

उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुरुवारी नवी मुंबईमधील महाप्रोधन यात्रेदरम्यान झालेल्या कार्यक्रमामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली. आपल्या भाषणांमुळे मागील काही काळामध्ये लोकप्रिय झालेल्या अंधारे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या चिठ्ठीच्या प्रकरणावरुन चांगलीच शाब्दिक फटकेबाजी केल्याचं पहायला मिळालं.सुषमा अंधारे यांनी, “काय काय बोलतील पत्ताच लागत नाही. आम्ही आमच्या आयुष्यात असं कधी पाहिलं नाही. काय काय पाहायला मिळतंय आम्हाला आज. माझा भाऊ मुख्यमंत्री आहे. मला वाईट वाटतं आहो. मला नाही चालत माझ्या भावाचा असा अपमान केलेलं. वाईट वाटतं मला. माझ्या भावाच्या समोरचा माईक ते काढून घेतात,” असं आपल्या भाषणात म्हटलं. त्यांचं हे विधान ऐकून सभागृहामध्ये उपस्थित असणारे सारेच हसू लागले. “बोलायला लागले की कागद देतात. का माझ्या भावाला येत नाही काही? माझा भाऊ ढ वाटतो का तुम्हाला? माझा भाऊ कॉप्या करुन पास झालाय का?” असा उपहासात्मक प्रश्न अंधारे यांनी विचारला.Sushma-Andhare-CM-Shinde.jpg