आवाज खाली...' असं म्हणणाऱ्या 'या' सदस्याची महेश मांजरेकर घेणार शाळा

in #yavatmal2 years ago

दसरा स्पेशल भागापासून कॅप्टनची निवड करायला सुरुवात झाली होती. अवघ्या चार दिवसात या १६ स्पर्धकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या कॅप्टन्सीच्या रेसमध्ये समृद्धी जाधव हिने (Samruddhi Jadhav) बाजी मारली आहे. दरम्यान आता बिग बॉस मराठीची पहिलीच चावडी पार पडणार आहे. यावेळी महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांनी घरातील सदस्यांची शाळा घेतली आहे.

नुकताच सोशल मीडियावर बिग बॉस मराठी ४चा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, BIGG BOSS मराठीची पहिलीच चावडी आणि महेश सरांनी घेतली शाळा ."BIGG BOSS मराठी" आज, रात्री 9:30 वा फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @voot वर.

या प्रोमोत पाहायला मिळत आहे की, महेश मांजरेकर म्हणत आहे की आठवडाभर हे घर वाजलं ते फक्त अपूर्वा नेमळेकरमुळे वाजले. ती सगळ्यांना सांगत होती आवाज खाली..आवाज खाली... सर्वात जास्त तू ओरडत होतीस. त्यावर अपूर्वा काही बोलणार तितक्यात प्रसाद जवादे म्हणाला प्रॉब्लेम तोच आहे. असं म्हणताच त्याच्यावर महेश मांजरेवर खूप भडकले आणि म्हणाले जवादे मी तुझी बाजू घेत नाहीये मी. मध्येमध्ये तोंड उचकायचं नाही. आज महेश मांजरेकर घरातील कोणकोणत्या सदस्यांची शाळा घेणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

View this post on Instagram
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

समृद्धीनं असा पटकावला कॅप्टन बनण्याचा मानकॅप्टन्सी टास्कमध्ये पैशांचा पाऊस पडला. या दोघींना योगेशकडून सोने विकत घेण्याचे टास्क होते. योगेश या टास्कचा संचालकही होता. या टास्कमध्ये या दोन्ही स्पर्धकांना त्यांच्या तीन स्पर्धकांच्या साहाय्याने सोन्याची वीट खरेदी करायची होती. सर्व फेऱ्या संपल्यानंतर ज्याच्याकडे सर्वाधिक विटा असतील तो कॅप्टन होणार होता. या सोन्याच्या विटा खरेदी करण्यासाठी त्यांनी BB पॉइंट्स वाचावायचे होते. या टास्कमध्ये समृद्धीने बाजी मारली.

bmarathi-big-boss-202210891709_202210893638.jpg

Sort:  

मॅडम आम्हाला पण लाईक करा