चीनकडून हेलिकॉप्टर खरेदी करून पाकिस्तान पस्तावला, भारताला झाला मोठा फायदा

in #yavatmal2 years ago

शेजारी असलेल्या पाकिस्तानने 2006 मध्ये चीनकडून मोठ्या अपेक्षेने Z-9EC हेलिकॉप्टरची खरेदी केले होते. भारतीय पाणबुड्यांचा शोध घेणे, असा त्यांचा उद्देश होता. ही हेलिकॉप्टर्स पाकिस्तानच्या नौदल आणि हवाई दलासाठी तयार केलेली खास ASW प्रकारचे आहेत. पण आता इस्लामाबादला या कराराचा प्रचंड पश्चाताप होत आहे. या अँटी-सबमरीन वॉरफेअर हेलिकॉप्टरची सर्वात मोठी समस्या म्हणजे, त्यांची देखभाल आहे आणि आता खराब झालेले हेलिकॉप्टर दुरुस्त करण्यात पाकिस्तान असमर्थ ठरत आहे.

पाकिस्तानने हार्बिन एअरक्राफ्ट इंडस्ट्रीकडून या हेलिकॉप्टरची खरेदी केली होती. मात्र, ही चिनी कंपनी हेलीकॉप्टर्सच्या स्पेअर पार्ट्सचा सप्लाय वेळेवर करण्यास असमर्थ ठरत आहे. यामुळे Z-9EC हेलीकॉप्टर्सपैकी अधिकांश हेलिकॉप्टर्स केवळ पडून आहेत.

भारताला डोळ्यासमोर ठेऊन पाकिस्तानने खरेदी केली होती विमाने -पाकिस्तानने भारताला डोळ्यासमोह ठेऊन पल्स कम्प्रेशन रडार, लो-फ्रिक्वेंसी सोनार, रडार वार्निंग रिसीव्हर आणि डॉपलर नेव्हिगेशन सिस्टिमने सू-सज्ज असलेले हे हेलिकॉप्टर्स खरेदी केले होते. मात्र, यातच डिफेन्सा ऑनलाइनच्या वृत्तानुसार, यामुळे नवी दिल्लीला धोका पोहोचण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. मात्र, पाकिस्तानने खरेदी केलेली ही हेलीकॉप्टर्स उड्डान करू शकत नसल्याने, आता भारतासाठी अरबी समुद्रात आपली उपस्थिती कायम ठेवणे अत्यंत सोपे होईल. सर्वात महत्वाचे म्हणजे आता भारत पाकिस्तानच्या सीमेत प्रवेश करून गुप्त माहिती मिळवू शकतो.

clipboarfadsd06_202209882875.jpg

Sort:  

Mam please like my post and follow me 🙏🙏