Nasa's Orion कामगिरी फत्ते! नासाची ओरिअन कॅप्सुल पोहोचली चंद्रावर; 50 वर्षांनंतर पुन्हा ऐतिहासिक नोंद

in #yavatmal2 years ago

Orayan.jpgवॉशिंग्टन : नासाची ओरियन कॅप्सूल सोमवारी चंद्रावर पोहोचली. चंद्राच्या मागच्या बाजूने फेरी मारत या कॅप्सूलनं चंद्राच्या कक्षेत विक्रमी 80 मैलांचं अर्थात 128 किमी अंतर कापलं. पृथ्वीपासून 232,000 मैल (375,000 किमी) पेक्षा जास्त अंतरावर असलेल्या चंद्राच्या मागून कॅप्सूल बाहेर येईपर्यंत ह्यूस्टनमधील फ्लाइट कंट्रोलर्सना अर्ध्या तासांचं कम्युनिकेशन ब्लॅकआउट पहायला मिळालं. पण या काळात कॅप्सूल व्यवस्थित आहे की नाही याबाबत इंजिनिअर्स काळजीत होते. (NASA Orion capsule has reached the moon whipping around the back side)