मूर्तिजापूरचे हुतात्मा स्मारक पडले अडगळीत

in #yavatmal2 years ago

मूर्तिजापूर : तालुक्याला स्वातंत्र्यपूर्व प्राचीन इतिहास नसला तरी देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यात या तालुक्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे. तालुक्यात शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी आपले श्रम खर्ची घातले, तर काहींनी आपले बलिदान दिले. या हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला येथील हुतात्मा स्तंभ आता काहीसा अडगळीत पडल्याने दुर्लक्षित झाला आहे. 'जे देशासाठी लढले ते अमर हुतात्म्ये झाले' असे म्हटले जात असले तरी त्याच्या बलिदानाच्या स्मरणार्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तत्कालीन हुतात्मा स्तंभ उभा आहे. स्वातंत्र्य मिळाल्या नंतर भारताची २५ वर्षे पूर्णत्वास झाल्या निमित्ताने तालुक्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ येथील (छत्रपती शिवाजी महाराज चौक) जयस्तंभ चौकात १५ ऑगस्ट १९७२ ते १४ ऑगस्ट १९७३ दरम्यान भारत.