राज्यातील साखर उत्पादनात २९८ लाख क्विंटलने वाढ

in #yavatmal2 years ago

पुणे - राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी यंदाच्या गळीत हंगामात २२ मे अखेरपर्यंत १३ कोटी नऊ लाख ३५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. या गाळपातून १३ कोटी ६२ लाख ५१ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीच्या गळीत हंगामाच्या तुलनेत यंदा २ कोटी ९८ लाख ५६ हजार क्विंटल इतके साखर उत्पादन वाढले आहे. दरम्यान अतिरिक्त उसाचे गाळप करण्यासाठी येत्या ३१ मेपर्यंत साखर कारखाने चालू ठेवण्याचा आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सर्व कारखान्यांना दिला आहे. यामुळे या आठवडाभरात आणखी ७२ लाख ११ हजार ७०० मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण होईल, अशी शक्यता साखर आयुक्तालयातून वर्तविण्यात आली आहे. राज्यातील ऊस गळीत हंगाम संपत आला तरीही काही कारखान्यांच्या क्षेत्रातील उस शिल्लक राहिला होता. या अतिरिक्त उसाचे गाळप करण्यासाठी नजीकच्या कारखान्यांकडून या उसाचे गाळप पूर्ण करण्याच्या सूचना साखर आयुक्तालयाने सर्व कारखान्यांना दिल्या आहेत. दरम्यान, गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात याच तारखेपर्यंत १० कोटी १३ लाख ५३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले होते. या उस गाळपातून १० कोटी ६३ लाख ९५ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले होते, असे साखर आयुक्तालयाने उस गाळपाबाबत प्रसिद्ध केलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. राज्यात यंदा सुमारे १२ कोटी ५० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होइल, असा अंदाज हंगाम सुरू होताना साखर आयुक्तालयाने गृहित धरला होता. परंतु प्रत्यक्षात या अंदाजाहून अधिक उसाचे गाळप पूर्ण झाले आहे.यंदाचा गळीत हंगाम दृष्टीक्षेपातराज्यातील सुरू असलेले कारखाने ---- २००सुरू कारखान्यांपैकी सहकारी ---- १०१सुरू असलेले खासगी कारखाने ---- ९९बंद असलेले कारखाने ---- १४०सुरू असलेल्या सर्व कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता ---- ८ लाख १ हजार ३०० मेट्रिक टनआतापर्यंत पूर्ण झालेले गाळप ---- १३ कोटी ९ लाख ३५ हजार मेट्रिक टन.आतापर्यंतचे एकूण साखर उत्पादन ------ १३ कोटी ६२ लाख ५१ हजार क्विंटलगेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढलेले गाळप ---- ३ कोटी ६७ लाख ९३ हजार मेट्रिक टनयंदा साखर उत्पादनात झालेली वाढ ----- २ कोटी ९८ लाख ५६ हजार क्विंटलयंदाचा सरासरी साखर उतारा --- १०.४० टक्के.विभागनिहाय पूर्ण झालेले ऊस गाळप (मेट्रिक टनमध्ये)कोल्हापूर --- २ कोटी ५४ लाख ६९ हजारपुणे ---- २ कोटी ६९ लाख ४८ हजारसोलापूर ---- २ कोटी ९९ लाख २५ हजारनगर ---- १ कोटी ९७ लाख ५३ हजार.औरंगाबाद ---- १ कोटी २८ लाख ९३ हजारनांदेड ---- १ कोटी ४४ लाख ९४ हजारअमरावती ---- १० लाख ३ हजारनागपूर ---- ४ लाख ५० हजार.विभागनिहाय साखर उत्पादन (क्विंटलमध्ये)कोल्हापूर --- ३ कोटी ४१ हजारपुणे ---- २ कोटी ९० लाख ८ हजारसोलापूर ---- २ कोटी ८३ लाख ०७ हजारनगर ---- १ कोटी ९७ लाख ९४ हजार.औरंगाबाद ---- १ कोटी २६ लाख ०४ हजारनांदेड ---- १ कोटी ५० लाख ७८ हजारअमरावती ---- ०९ लाख ६७ हजारनागपूर ---- ०३ लाख ८० हजार.

Sort:  

👍👍👍