बिल्डिंगच्या पार्किंगपासून ते धकधक गर्लसोबत डान्स;

in #yavatmal2 years ago

मराठीतील एक आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर येत्या काळात देशातील प्रसिद्ध डान्स रिऍलिटी शो ‘झलक दिखला जा’ मध्ये दिसून येणार आहे. अमृता आणि नृत्य यांचं नातं खूप घट्ट आहे हे एव्हाना चाहत्यांना कळलं आहेच पण त्यांच्या लाडक्या अमुची डान्स जर्नी भलतीच स्पेशल आहे. याबद्दल स्वतः अमृताने तिच्या नव्या युट्युब व्हिडिओमध्ये खुलासा केला आहे. तर चाहत्यांच्या लाडक्या चंद्राचा नृत्याचा प्रवास कसा सुरु झाला माहित आहे का?

अमृताचा नृत्यप्रवास 1994साली सुरु झाला. बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये तिच्या नृत्याची सुरुवात झाली. गणेशत्सवासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन व्हायचं त्यामध्ये तिने नाच करायला सुरुवात केली. “मला कोणी विचारलं मला कोणते नृत्यप्रकार येतात तर मी सांगेन.