बापरे! चित्रपटासाठी तब्बल 1 कोटी मानधन घेणारी 'ती' पहिली Actress

in #yavatmal2 years ago

बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते-अभिनेत्री आहेत, जे एका चित्रपटासाठी करोडो रुपये फिस घेतात. या पक्तीत अभिनेत्रींचे प्रमाण फारचं कमीच आहे. मात्र ही एक अभिनेत्री अशी होती जी, त्यावेळी फक्त हिरोंचेच चित्रपट चालायचे, त्याकाळी ती एका चित्रपटासाठी तब्बल एक कोटीची फिस घ्यायची. ही अभिनेत्री आहे तरी कोण ते जाणून घेऊयात.

बॉलिवूडची हवा हवाई गर्ल श्रीदेवीचा (Sridevi Birth Anniversary) आजच्या दिवशी 13 ऑगस्ट 1963 रोजी जन्म झाला होता. तामिळनाडूतील मीनमपट्टी या छोट्याशा गावात तिचा जन्म झाला होता. श्रीदेवीने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. यानंतर ती थांबलीच नाही तब्बल 50 वर्षे तिने अनेक उत्तमोत्तम चित्रपट देत इंडस्ट्रीवर राज्य केलं होतं.