उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने बोलावली पोलिस अधिकाऱ्यांची बैठक

in #yavatmal2 years ago

esakal_new__25_.jpgमुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला एका पाकिस्तानी क्रमांकावरुन दहशतवादी हल्ल्याची धमकी आली आहे. त्यानंतर राज्यात चांगलीच खळबळ माजली दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली आहे. तसेच आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूचाही बैठकीत आढावा घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) ट्रॅफिक कंट्रोल रूमच्या व्हाट्सअपवर धमकीचा मेसेज आल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले. याप्रकरणाचा तपास वेगानं सुरु करण्यात आला आहे. मुंबईला धमकी देणारा फोन लाहोरचा असून त्याचे नाव इम्तियाज आहे. इम्तियाजने दावा केला आहे की तो सरकारी विभागात काम करतो आणि व्यवसायाने माळी आहे. अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली होती.तसेच, या धमकीपूर्वी, हरिहरेश्वर समुद्रकिनारी एक संशयित बोटमध्ये AK 47 बंदुका आढळून आल्या आहेत. एकूण तीन बंदुकांनी भरलेलील बॅग मिळाली. ही बोट नेपच्यून मेरीटाइम सिक्युरिटी लिमिटेड नावाच्या ब्रिटीश कंपनीची बोट आहे. या कंपनीची यूकेमध्ये 2009 मध्ये नोंदणी झाली आहे. ही कंपनी सुरक्षेसाठी शस्त्रे पुरवणारी कंपनी आहे. ही कंपनी हल्ल्याला तोंड देण्यासाठी शस्त्रे पुरवते. अशी माहिती मिळाली.या दोन्ही घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिस अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीत दोन्ही घटनेचा आढावा घेतला जाणार आहे. सण उत्सवाच्या काळात पोलिसांच्या सुरक्षेबाबत ही करणार मार्गदर्शन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Sort:  

Please like my post