अमेरिका, चीनच्या तुलनेत भारतात महागाई कमी; केंद्रीयमंत्री कराड यांचा दावा

in #yavatmal2 years ago

bhagavat_karad_1.jpgऔरंगाबाद - देशातील महागाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच सण-उत्सव सुरू झाले असून महागाईने होरळपणाऱ्या नागरिकांना खर्चाचा मेळ बसवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यातच सरकारने अनेक खाद्यपदार्थांवर जीएसटी लागू केला आहे. त्यामुळे महागाईचा भडका उडाला आहे. हाच धागा पकडून राष्ट्रवादी काँग्रेसचने नेते एकनाथ खडसे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्याला केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी प्रत्युत्तर देत अमेरिका आणि चीनचे उदाहरण दिले आहे. (Bhagwat Karad news in Marathi)एकनाथ खडसे म्हणाले की, महागाईमुळे गणेशोत्सवाचा आनंदही राहिला नाही. तसेच उत्साह राहिला नाही. गणेशोत्सवासाठी लागत असलेलं दही, दुध महागल्याची टीका खडसे यांनी केली. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं की, गणेशोत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करा. मात्र अलिकडच्या स्थितीत उत्साह आणि आनंदावर महागाईचं विर्जन पडलं आहे.खडसे पुढं म्हणाले की, दुध, दही, लोणी सगळं महागलं. गणपतीला वाहायचे मोदकही महाग झाले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक हवालदील झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे जो आनंद आणि उत्साह असतो त्या उत्साहावर महागाईने विर्जन घातल्याची टीका खडसे यांनी केली.खडसे यांच्या टीकेला केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महागाई आहेच. मात्र ही महागाई संपूर्ण जगात आहे. अमेरिका आणि चीनशी तुलनेत भारतात महागाई कमी आहे. भारताची अर्थव्यवस्था वाढत असल्याचंही कराड यांनी नमूद केलं.