नेरुळ-सीवूडदरम्यान रेल्वे रुळाला तडे! हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

in #yavatmal2 years ago

2technical_20problem_20in_20trans_20harbor_20local_20line.jpgमुंबई : हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. नेरुळ आणि सीवूडजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतूकीवर याचा परिणाम झाला आहे. रेल्वे रुळाला तडा गेल्याने अर्धा तासापासून लोकल नेरुळ स्थानकावर अडकून पडल्या आहेत. वाशी-पनवेल स्थानकादरम्यान देखील लोकल गाड्या ठप्प झाल्या आहेत. रेल्वे स्थानकावर अनेक प्रवाशी खोळंबले असून दूरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.पनवेल ते वाशी या मार्गादरम्यानची रेल्वे वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली होती. रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम हातात घेतले होते. त्यानंतर अर्धा तास खोळंबा झाल्यानंतर प्रशासनाने रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम पुर्ण केलं आणि त्यानंतर या हार्बर लाईनवरील रेल्वे सेवा पुन्हा एकदा पुर्ववत झाली.