उद्धव ठाकरेंना दिलासा! सेनेला पुन्हा निवडणूक आयोगाकडून चार आठवडे मुदत

in #yavatmal2 years ago

Vishwas__45_.jpgमुंबई : शिवसेनेतील बंडखोरीनंतर आमदारांबद्दल सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे यासोबतच दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षासंदर्भात पुरावे सादर करण्याचे आदेश शिवसेना आणि शिंदे गटाला दिले. यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. या मागणीला पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगाने संमती दिली आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला आहे.राज्यात सध्या उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात सत्ता संघर्ष सुरु आहे. यादरम्यान उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने ४ आठवड्याची मुदत दिली आहे. कागदपत्र सादर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला चार आठवड्याचा वेळ दिला आहे.सुप्रीम कोर्टात घटनापीठाची तारीख तसेच शिवसेनेच्या याचिकांवरील सुनावणी लांबणीवर पडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. यादरमय्यान २३ ऑगस्टला शिवसेनेला आधी दिलेली पुरावे सादर करण्याची मुदत संपुष्टात येत होती. त्यामुळे शिवसेनेने चार आठवड्याची मुदत मागीतली होती ती त्यांना असी मुदत देण्यात आली आहे. मागच्या वेळी देखील शिवसेने चार आठवड्यांचा वेळ मागितला होता तेव्हा शिवसेनेला दोन आठवड्याचा वेळ दिला होता, हा वेळ २२ ऑगस्ट रोजी संपला होता.सुप्रीम कोर्टामध्ये अनेक मुद्दे प्रलंबित असताना निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई करू नये अशी उद्धव ठाकरे यांची भुमिका आहे. दरम्यानच्या काळात घटनापीठ स्थापन झाल्यानंतर यासंदर्भात काय होतं हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना दिलासा देत कागदपत्रे सादर करण्यासाठी मागीतलेली चार आठवड्यांची मुदत दिली आहे. शिवसेनेवरील दावा सिध्द करण्यासाठी चार आठवड्यात उद्धव ठाकरे यांना पक्ष आणि चिन्हाबाबत कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.