रेल्वे रुळावर जीवघेणी खेळ

in #yavatmal2 years ago

घणसोली, ता. १५ (बातमीदार) ः रेल्वे रुळावर अथवा धावत्या ट्रेनमध्ये सेल्फी काढण्याचा मोह अनेकदा जीवावर बेतण्याचा धोका अधिक असतो, पण सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेन्टचा पाऊस पाडण्याच्या मोहातून तरुणाई या जीवघेण्या प्रकारांच्या आहारी गेली आहे. घणसोली रेल्वे स्थानकात रेल्वे रुळावर फोटो काढण्याचे स्टंट सर्रासपणे केले जात असून हा निष्काळजीपणा एखाद्याच्या जीवावर बेतण्याचा धोका अधिक आहे.सोशल मीडियावरील प्रसिद्धीचे आकर्षण असलेली तरुणाई जीवावर बेतणाऱ्या स्टंटबाजीच्या आहारी गेली आहे. काही तरी वेगळे करण्याच्या ओढीमुळे नकळत जीवावर बेतण्याचा धोका अधिक बळावला आहे. त्यातूनच मग रेल्वे रुळावर सेल्फी अथवा फोटो काढण्याची क्रेझ सध्या वाढली आहे. हा मोह अनेकदा जीवघेणा ठरलेला आहे. घणसोली रेल्वे स्थानकावर अनेकदा रेल्वे रुळावर सेल्फी अथवा फोटो काढण्याचे जीवघेणे स्टंट केले जातात. रेल्वे प्रशासन यासंदर्भात वारंवार सूचना देत असते; मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने रेल्वे रुळावर अथवा ट्रेनसोबत फोटो काढणाच्या प्रकारांत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या प्रकारांकडे रेल्वे प्रशासन आणि पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने प्रसिद्धीचा हा मोह कोणाच्या तरी जीवावर बेतण्याची शक्यता आहे.़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़रेल्वे रुळावर स्टंटबाजी करणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरू आहे, तसेच जनजागृतीवर भर दिला जात आहे.- संभाजी कटारे, पोलिस निरीक्षक, वाशी रेल्वे स्थानक

Sort:  

https://wortheum.news/@kunalagrawal#
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
Sir/Ma'am please follow me and like my post.