Pune : चांदणी चौकात वाहतूक कोंडी! पुणेकरांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

in #yavatmal2 years ago

bhushan_esakal___2022_08_26T222200_833.pngपुणे : चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न नागरिकांनी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडला. शुक्रवारी रात्री 8 वाजता मुख्यमंत्री शिंदे हे सातारा येथे निघाले असताना चांदणी चौकाजवळ त्यांनी नागरिकांचे म्हणणे एकून घेतले, त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देऊन तत्काळ उपाययोजना करण्यास सांगितले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही स्थानिक प्रवाश्यांच्या समस्या ऐकून घेत तात्काळ चांदणी चौक वाहतूक कोंडी संदर्भात पुणे महापालिका आयुक्त, पिपंरी चिंचवड पोलिस आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, नॅशनल हायवे प्राधिकरण आणि राज्याचे मुख्य सचिव यांना फोन करून प्रवाश्यांची समस्या दूर करण्यास सांगितले. दरम्यान त्यानुसार उद्या सकाळी ११. 30 वाजता चांदणी चौकात संबंधित सर्व आस्थापनांचे वरिष्ठ अधिकारी येऊन पहाणी करणार आहेत. पहाणी करून झाल्यावर प्रवाश्यांची समस्या कशी सोडवणार याचा अहवालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला जाणार आहे.चांदणी चौक येथे मागील काही महिन्यापासून होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरीक त्रस्त आहेत. याबाबत नागरिकांनी वारंवार प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यासह विविध स्तरावर प्रश्न मांडला. तरीही हा प्रश्न सुटण्यास अद्याप तयार नाही. त्यामुळे अखेर नागरिकांचा ही अखेर संयम सुटला. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे हे शुक्रवारी रात्री साताऱ्यातील सातोला या ठिकाणी जात होते. त्यांचा ताफा रात्री आठ वाजता चांदणी चौकाजवळ सुस खिंड येथे आला. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी नागरिकांची वाहने थांबवून मुख्यमंत्री शिंदे यांच्या ताफ्याला वाट करून देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे या मार्गाने जात असल्याने काही संघटना व नागरिकांनी हि मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी त्यांना थांबण्याची विनंती केली. त्यानुसार शिंदे यांनी तेथे थांबून काही वेळ नागरिकांशी संवाद साधला. तेव्हा, तेथील नागरिकांनी चांदणी चौक येथील उड्डाणपूल कामामुळे होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या मांडली. त्यांनी संदर्भात स्थानिक नागरिकांचे गाऱ्हाणे एकून घेतले. शिंदे यांनी तात्काळ संबंधीत सर्व अस्थापनांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांदणी चौकातील फ्लायओव्हरपाशी होणाऱ्या वाहतूक कोंडीची पहाणी करून प्रवाश्यांची समस्या सोडवण्याचे आदेश दिले आहेत.मुख्यमंत्री शिंदे यांनी वाहतूक कोंडी संदर्भात पुणे महापालिका आयुक्त, पिपंरी चिंचवड पोलिस आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, नॅशनल हायवे प्राधिकरण आणि राज्याचे मुख्य सचिव यांना फोन करून प्रवाश्यांची समस्या दूर करण्यास सांगितले. त्यानुसार उद्या सकाळी 11.30 वाजता चांदणी चौकात संबंधित सर्व आस्थापनांचे वरिष्ठ अधिकारी येऊन पहाणी करणार आहेत. पाहाणी करून झाल्यावर प्रवाश्यांना भेडसावत असलेल्या समस्या कशाप्रकारे सोडवता येतील याचा अहवाल तयार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.