राज ठाकरे फायटर नेते"; बावनकुळेंकडून कौतुकाचा वर्षाव

in #yavatmal2 years ago

raj_Thackeray_Chandrashekhar_Bawankule.jpgमुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना राज यांचं खास शब्दांत कौतुक केलं. राज ठाकरे हे फायटर आहेत, असं वर्णन बावनकुळे यांनी केलं आहे. (Raj Thackeray is a fighter a shower of praise from BJP Chandrashekhar Bawankule)बावनकुळे म्हणाले, "मी वारंवार सांगतोय की राज ठाकरे हे महाराष्ट्रांच, जनतेचं आणि हिंदुत्वाचं रक्षण करणारे एक अत्यंत प्रामाणिक, निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, ते एक फायटर आहेत. त्यांना मी याच दृष्टीकोनातून बघतो. यादृष्टीनेच मी त्यांची कौटुंबिक भेट घेतली आहे"राज ठाकरेंसोबतच्या आजच्या भेटीचा राजकीय संदर्भ काढू नये. आमचे कौटुंबिक संबंध आहेत. माझ्या कौटुंबिक कार्यक्रमांना ते हजेरी लावतात तसा मी देखील त्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावतो. पण आता भाजपचा अध्यक्ष झाल्यानंतर सदिच्छ भेट घेणं हे माझं काम काय आहे, अशा शब्दांत या भेटीचं वर्णन बावनकुळे यांनी केलं.शिवसेनेचं हिंदुत्व बेगडीशिवसेनेची अवस्था अशी झाली आहे की, संघ परिवाराच्या आणि विश्व हिंदु परिषदेच्या कट्टर विरोधी अशा संभाजी ब्रिगेडशी ते युती करतात. शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेससोबत बसतात तर ते कशाला हिंदुत्वाच्या गोष्टी करतात. पुढच्या काळात खऱ्याअर्थानं जनता ठरवेल की खरं कोणाचं आणि खोटं कोणाचं. मला निश्चित माहिती आहे की, उद्धव ठाकरे आता हिंदुत्वाचे राहिलेले नाहीत. त्यांनी आता सारं सोडून दिलं आहे. कौटुंबिक जीवनात त्यांनी सर्व सोडून दिलं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनाचं कार्याला बगल देऊन ते आपलं कर्तव्य करत आहेत.