लता दीदींची स्वप्नपूर्ती! कलाकारांसाठी वृद्धाश्रमाची होणार निर्मिती

in #yavatmal2 years ago

भारतातच नाहीतर जगभरामध्ये ज्यांच्या आवाजाचे चाहते आहेत अशा गानकोकिळा लता मंगेशकरांनी चाहत्यांना अक्षय आनंद दिला. त्यांच्या आवाजाची जादू कायम आहे. लता दीदींच्या जाण्यानं भारतीय संगीत (Indian Music News) विश्वावर मोठा आघात झाल्याचे दिसून आले. देश शोकसागरात बुडून गेला होता. दीदींनी आपल्या हयातीत वेगवेगळे सामाजिक (Singer Lata Mangeshkar) उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांचे सामाजिक योगदान हा नेहमीच चर्चिला जाणारा विषय आहे. आता लता दीदींच्या नावानं एका वृद्धाश्रमाची निर्मिती केली जाणार आहे.

लहानांपासून ज्येष्ठांपर्यत लता दीदींच्या गाण्याचे चाहते जगभर पसरले आहेत. (Indian Singer) लता दीदींच्या नावानं काही समाजपयोगी उपक्रम सुविधा सुरु करता येतील का याची चर्चा सुरु होती. आता दीदींचं स्वप्न पूर्ण होणार आहे. ते म्हणजे वृद्धाश्रमाची उभारणी. भारतीय संगीत विश्वातील अनेक गोष्टींसाठी लता दीदींनी नेहमीच पुढाकार घेतला. त्यांनी सढळ हातानं मदत केली. त्यामुळे भारतीय संगीत विश्व हे नेहमीच त्यांची ऋणी राहणार आहे.

काही दिवसांपूर्वी दीदींच्या नावानं संगीत विद्यालय सुरु करण्याविषयी देखील चर्चा सुरु होती. ते काम देखील पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात आले आहे. आता लता मंगेशकर यांच्या इंस्टा अकाउंटवरुन एक पोस्ट शेयर करण्यात आली आहे. त्यामध्ये लता मंगेशकर यांचे एक स्वप्न पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे की, देशाच्या गानकोकिळा स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी एक स्वप्न उराशी बाळगले होते. आता ते पूर्ण होणार आहे.वृद्धाश्रमाची निर्मिती करणं हे दीदींचं स्वप्न होतं. ते अशा लोकांसाठी की जे संगीत, आर्ट, चित्रपट आणि थिएटरशी संबंधित आहे. त्यांच्याकरिता वृद्धाश्रमाची निर्मिती केली जाणार आहे. त्या फाउंडेशनचे म्हणणे आहे की, ज्या कलाकारांनी कला क्षेत्रासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे, त्यांनी अथक संघर्ष केला आहे. मात्र ते एकटे आहेत. कुटूंबापासून दुरावले गेले आहेत. त्यांच्यासाठी या महत्वांकांक्षी प्रोजेक्टची निर्मिती करण्यात आली आहे.

Sort:  

Good job