भारतात लेकुरे उदंड!

in #yavatmal2 years ago

न्यूयॉर्क : पुढील वर्षी भारत चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होण्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी आज जाहीर केलेल्या अहवालात व्यक्त केला आहे. जगाची लोकसंख्या यावर्षी नोव्हेंबरच्या मध्यात आठ अब्जावर जाण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. जागतिक लोकसंख्या दिना(ता.११) निमित्ताने हा अहवाल प्रकाशित करण्यात आला.

संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक व लोकसंख्या विभागाने ‘जागतिक लोकसंख्या संभाव्यता २०२२’ या नावाने हा अहवाल प्रकाशित केला आहे. त्यात म्हटले आहे, की जागतिक लोकसंख्या १९५० नंतर सर्वांत कमी वेगाने वाढत असून २०२० मध्ये एक टक्क्याने कमी झाली आहे. ती २०३० मध्ये ८.५ अब्ज आणि २०५० मध्ये ९.७ अब्जांवर जाण्याचा अंदाज आहे. त्यानंतर, २०८० मध्ये १०.४ अब्जांसह शिखर गाठल्यानंतर जगाची लोकसंख्या २१०० पर्यंत स्थिर राहील, असेही नमूद केले आहे.

या अहवालानुसार, भारत २०२३ मध्ये चीनला मागे टाकत सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनण्याचा अंदाज आहे. सध्या भारताची लोकसंख्या एक अब्ज ४१ कोटी २० लाख तर चीनची एक अब्ज ४२ कोटी साठ लाख आहे. जगातील भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आदी दहा देशांमध्ये २०१० ते २०२१ दरम्यान दहा लाखांपेक्षा अधिक जणांनी स्थलांतर केले. त्याचप्रमाणे, सिरिया, व्हेनेझुएला, म्यानमार या देशांतून स्थलांतरितांच्या प्रमाणात वाढ झाली.

जागतिक सरासरी आयुर्मानातही वाढ झाली असून ते २०१९ मध्ये ७२.८ वर पोचले. त्याचप्रमाणे, जागतिक सरासरी मृत्युदरही २०५० पर्यंत ७७.२ वर्षांवर पोचण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, जागतिक लोकसंख्येत ६५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांची संख्या २०२२ मधील दहा टक्क्यांवरून २०५० मध्ये १६ टक्क्यांवर जाण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. कोरोनाच्या साथीमुळे लोकसंख्या बदलाच्या प्रमुख घटकांवरही परिणाम केला असून २०२१ मध्ये जागतिक आयुर्मान ७१ वर्षांपर्यंत कमी झाले, असेही अहवालात म्हटले आहे.असमतोल होऊ देणार नाही’

लखनौ : लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम यशस्वी व्हायलाच हवा, पण त्याच वेळी ‘लोकसंख्येचा असमतोल’ मात्र होऊ दिला जाणार नाही, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज स्पष्ट केले.

उत्तर प्रदेशमध्ये आजपासून ‘लोकसंख्या नियंत्रण पंधरवडा’ सुरु झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते म्हणाले की,‘आपण कुटुंब नियोजन किंवा लोकसंख्या स्थिर राहण्याबाबत बोलतो, त्यावेळी लोकसंख्या नियंत्रणाचा कार्यक्रम यशस्वीपणे सुरु ठेवणे आवश्‍यक आहे. पण त्याचवेळी, लोकसंख्येचा असमतोल होईल, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, याकडेही आपण लक्ष द्यायला हवे. गेल्या पाच दशकांपासून लोकसंख्येबाबत जनजागृती केली जात आहे. लोकसंख्या स्थिर झाली तरीही ती आरोग्यदायी आणि रोगमुक्त असली तरच ते यश मानायला हवे.’ उत्तर प्रदेशमधील जनतेला अधिक आरोग्यपूर्ण बनविण्यासाठी आशा सेविका, अंगणवाडी सेविका, सरपंच, शिक्षक आणि इतरांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहनही योगी आदित्यनाथ यांनी केले.

यंदा आठ अब्जावा रहिवासी जन्म घेण्याची शक्यता आहे. मैलाचा दगड ठरणाऱ्या या वर्षात लोकसंख्या दिन साजरा होतोय. जैवविविधता साजरी करण्याचा, सामान्य मानवता ओळखण्याचा हा प्रसंग आहे. आरोग्य क्षेत्रातील प्रगतीने जीवनमान वाढले असून माता व बालमृत्यूचा दरही घटला. त्याचवेळी पृथ्वीबद्दलल्या सामाईक जबाबदारीची आठवण करून देणारा व एकमेकांबरोबरच्या वचनबद्धतेत कुठे कमी पडतो, याचा विचार करण्याचाही क्षण आहे.