नागपूर : नदी, नाल्या लगतच्या पिकांचे पंचनामे

in #yavatmal2 years ago

eSakal__19_.jpgनागपूर : जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत अतिवृष्टी व शेतपिकांच्या नुकसानीवर वादळी चर्चा झाली. प्रशासनाने तयार केलेल्या अहवालात अनेक पीक वगळण्यात आली असून फक्त नदी व नाल्या काठावरील पिकांचे पंचनामे करण्यात आल्याने नुकसानाची आकडा कमी दाखविण्यात आल्याचा आरोप सर्वच सदस्यांनी केली. सदस्यांनी तालुका व गावांच्या नुकसानाची माहिती देत प्रशासनाच्या केलेल्या पंचनाम्याचा पंचनामा केला.गेल्या सव्वा महिन्यापासून सतत पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु, प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात फारच कमी क्षेत्र दाखविण्यात आले. पंचनामा करताना अनेक गावे वगळण्यात आल्याचा मुद्दा सत्तापक्ष नेत्या अवंतिका लेकुरवाळे यांनी उपस्थित केला. प्रकाश खापरे यांनीही तो उचलून धरला. प्रशासनाने केलेले पंचनामे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.ताज्या
शहर

मनोरंजन

देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

नागपूर : नदी, नाल्या लगतच्या पिकांचे पंचनामे
Published on : 11 August 2022, 6:13 am

By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत अतिवृष्टी व शेतपिकांच्या नुकसानीवर वादळी चर्चा झाली. प्रशासनाने तयार केलेल्या अहवालात अनेक पीक वगळण्यात आली असून फक्त नदी व नाल्या काठावरील पिकांचे पंचनामे करण्यात आल्याने नुकसानाची आकडा कमी दाखविण्यात आल्याचा आरोप सर्वच सदस्यांनी केली. सदस्यांनी तालुका व गावांच्या नुकसानाची माहिती देत प्रशासनाच्या केलेल्या पंचनाम्याचा पंचनामा केला.

गेल्या सव्वा महिन्यापासून सतत पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु, प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात फारच कमी क्षेत्र दाखविण्यात आले. पंचनामा करताना अनेक गावे वगळण्यात आल्याचा मुद्दा सत्तापक्ष नेत्या अवंतिका लेकुरवाळे यांनी उपस्थित केला. प्रकाश खापरे यांनीही तो उचलून धरला. प्रशासनाने केलेले पंचनामे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.
RECOMMENDED ARTICLES
नरखेड : तेरा वर्षातील सर्वाधिक पाऊस, शेती वाया; शिंदे सरकार लक्ष कधी देणार?
Nagpur
नरखेड : तेरा वर्षातील सर्वाधिक पाऊस, शेती वाया; शिंदे सरकार लक्ष कधी देणार?
1 Aug 2022
READ MORE
नागपूर : तेरा वर्षात जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस
Nagpur
नागपूर : तेरा वर्षात जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस
1 Aug 2022
READ MORE
लवकरच भरणार ८० हजार पदे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
Maharashtra:Marathwada
लवकरच भरणार ८० हजार पदे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
9 Aug 2022
READ MORE
Konkan : दैव बलवत्तर म्हणून तीघे बचावले, कणकवलीतील बावशी गावठण येथे कोसळले घर
Kokan
Konkan : दैव बलवत्तर म्हणून तीघे बचावले, कणकवलीतील बावशी गावठण येथे कोसळले घर
6 Aug 2022
READ MORE
Pune
मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
3 Aug 2022
READ MORE
nanded.
नांदेड : बळिराजाला न्याय मिळवून देणार...
31 Jul 2022
READ MORE
Nagpur
नागपूर : शेतकऱ्यांच्या हितार्थ आंदोलन
2 Aug 2022
READ MORE
Vidarbha
बुलडाणा : शेतकऱ्याने लावला थेट मुख्यमंत्र्यांना फोन
30 Jul 2022
READ MORE
Nashik.
Nashik : पावसामुळे 'समृद्धी'चे पाणी शेतात साचून पिकांचे नुकसान
10 Aug 2022
READ MORE
Maharashtra
Bacchu Kadu : बच्चू कडूंच्या मंत्रीपदाबाबत दीपक केसरकरांचे मोठं विधान ; म्हणाले, 'त्यांना...'
11 Aug 2022
READ MORE
शांता कुमरे, अरूण हटवार, मिलिंद सुटे, व्यंकट कारेमोरे, राधा अग्रवालसह सर्वच अनेक सदस्यांनी त्याला साथ दिली. पंचनामे कशा पद्धतीने करण्यात आले याचा जाब विचारण्यात आला. अध्यक्ष रश्मी बर्वे यांनीही पंचनाम्यावर नाराजी व्यक्त करीत सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे आदेश दिले. जिल्हा कृषी अधीक्षक, जिल्हा कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी जिल्ह्यातील एकूण क्षेत्रातील नुकसानाची माहिती दिली. परंतु, फक्त नदी, नाल्या काठच्याच शेतांचे पंचनामे करण्याच्या मुद्यावर उत्तर देता आले नाही.हेक्टरी १ लाख मदत द्याजिल्ह्यात शंभर टक्के शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पंचनामे चुकीचे असल्याने ते नव्याने करण्याची गरज असल्याचे अध्यक्षा रश्मी बर्वे म्हणाल्या. सर्वच क्षेत्रातील नुकसान असल्याने पंचनाम्याची गरज नसून सर्व क्षेत्रातील नुकसान गृहीत धरावे, असे काही जण म्हणाले. ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट सर्व क्षेत्र गृहीत धरून हेक्टरी १ लाख रुपये मदत देण्याचा ठराव अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी मंजूर केला. विरोधी पक्षनेते आतिश उमरे व राष्ट्रवादीचे गट नेते दिनेश बंग यांनीही त्याला समर्थन दिले.शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांना दुबार पेरणीही करता येणार नाही. जमीन खरडून गेल्याने रब्बीचे पीक घेता येईल का, याबाबत शंका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले पाहिजे.-कुंदा राऊत, सदस्यअतिवृष्टी व पुरामुळे ज्यांची घरे पडली त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून प्राधान्याने घर मंजूर केले पाहिजे. वीज बिल माफ करून शेतकऱ्यांना पशुधनाचे वाटप करण्याची गरज आहे.- समीर उमप, सदस्यअतिवृष्टीमुळे पूल व रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशी कामे करण्यासाठी शासनाने कामांच्या संदर्भात दिलेली स्थगिती उठवावी.-मिलिंद सुटे, सदस्यमौदा, भिवापूर, कुही, तालुक्यातील मिरची पिकांचे १ हजारांवर हेक्टरमध्ये नुकसान झाले. परंतु पंचनामे करताना त्यांचा उल्लेखच करण्यात आला नाही. त्यांना यातून वगळण्यात आले. त्यांचा समावेश करून शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे.-दुधाराम सव्वालाखे, सदस्यकाटोल व नरखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा व मोसंबीचे नुकसान झाले आहे. परंतु पंचनामा करताना त्यांचा कोणत्याही प्रकारे उल्लेख नाही.पंचनामेचे चुकीचे आहे. केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्यातून नागपूरला वगळणे योग्य नाही.-सलिल देशमुख, सदस्यजिल्हा परिषदेला काय देता येईल यावर भर दिला पाहिजे. सेस फंडातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना या जास्त नुकसान झालेल्यांची माहिती घेऊन त्यांना प्राधान्याने लाभ द्यावा. सदस्यांचे मानधन करून त्यांना काही आर्थिक लाभ देता येईल का, याचीही विचार झाला पाहिजे.-संजय झाडे, सदस्य

Sort:  

Please follow me and like my post🙏🙏🙏🙏