सेनेनंतर आता कॉंग्रेसमध्ये फूट? आमदार संग्राम थोपटे फडणवीसांच्या भेटीला

in #yavatmal2 years ago

bhushan_esakal___2022_08_26T182543_717.pngमुंबई : शिवसेनेच्या अनेक आमदार-खासदारांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील माहाविकास आघाडी सरकर कोसळलं. दरम्यान शिवसेनेत झालेल्या या बंडखोरीनंतर आता कॉंग्रेसला देखील खिंडार पडणार असल्याची चर्चा आहे. कारण कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दरम्यान या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीनंतर राज्यात शिवसेनेनंतर आता कॉंग्रेसचे आमदार फुटणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.दोन महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे गटातील ४० आमदार फुटले आणि राज्यात शिंदे फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर महाराष्ट्रात कॉंग्रेसमध्ये देखील अस्वस्थता दिसून येत होती, बहुमताच्या चाचणीवेळी देखील कॉंग्रेसचे आमदार सभागृहाच्या बाहेर राहिले होते. तेव्हापासून कॉंग्रेसचे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत काय असे बोलले जात होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अस्लम शेख यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.दरम्यान आता संग्राम थोपटे यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे. सागर बंगल्यावर त्यांची फडणवीसांसोबत गुप्त बैठक झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान या भेटीमुळे कॉंग्रेमध्ये देखील बंडखोरी होणार का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.