Maharashtra Rain: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय; तर विदर्भात यलो अलर्ट

in #yavatmal2 years ago

राज्यभरात काल पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून आले. दरम्यान, अकोला, पुणे, मुंबईसह उपनगरांमद्धे अनेक भागात रात्री उशिरा पाऊस झाला. राज्यात पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, राज्यात काल पुन्हा पावसाने चांगलीच हजेर लावली आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुणे, अकोला, कोल्हापूर परिसरात चांगलाच पाऊस झाला आहे. त्याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यातही दुपारपासून अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे.