देशात महागाईनं उच्चांक गाठला आहे. तर घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती हजाराच्या पार गेल.

in #yavatmal2 years ago

देशात महागाईनं उच्चांक गाठला आहे. तर घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती हजाराच्या पार गेल्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट गडबडलं आहे. अशातच महागाईचा विरोधी पक्षांकडून वेगवेगळ्या पद्धतीनं निषेध केला जातो आहे. तर तेलंगणामध्ये गॅस सिलेंडरवर मोदीचा हसतमुख फोटो लावून केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. टीआरएसकडून गॅस सिलिंडरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावत त्यावर 'मोदीजी Rs. 1150' असे लिहले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.