Soybean Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर वाढले?.

in #yavatmal2 years ago

कापसाचं नुकसान वाढतंय

  1. देशातील बाजारात नव्या कापसाची आवक दिवसेंदिवस वाढतेय. उत्तर भारतात कापूस आवक जास्त आहे. मात्र मागील काही दिवसांपासून महत्वाच्या कापूस उत्पादक पट्ट्यात पाऊस पडतोय. त्यातच कापूस पीक सध्या बोंड फुटण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळं सध्या सुरु असलेल्या पावसानं कापूस पिकाचं नुकसान होतंय. त्यामुळं बाजारातील कापूस आवक गेल्या वर्षीपेक्षा कमीच आहे. सध्या कापसाला ७ हजार ५०० ते १० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय. मात्र यंदा कापसाला सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो, त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन कापसाची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.
Sort:  

Please like my all news