Sunny: 'लांब गेल्यावरच आपल्या लोकांची किंमत कळते...'; 'सनी' चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस

in #yavatmal2 years ago


झिम्मा' चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानंतर 'झिम्मा'ची टीम प्रेक्षकांसाठी आता एक नवीन भेट घेऊन आली आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सनी' लवकरच प्रदर्शित होणार असून नुकताच त्याचा जबरदस्त ट्रेलर सोशल मीडियावर झळकला आहे. घरापासून दूर राहिलेल्या प्रत्येकाची ही गोष्ट आहे. विविध भावनांनी भरलेला हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांना 'सनी'ची कहाणी जाणून घेण्याची उत्सुकता अधिकच वाढली आहे. ललित प्रभाकर, चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग, अभिषेक देशमुख, अमेय बर्वे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे. क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित 'सनी'चे अक्षय बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस, उर्फी काझमी 'सनी'चे निर्माते आहेत. तर संतोष खेर आणि तेजस्विनी पंडित सहनिर्माते आहेत.