Covid च्या नव्या व्हेरिएंटचा धूमाकुळ; शास्त्रज्ञांकडून धोक्याची घंटा

in #yavatmal2 years ago

china_corona.jpg

ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

Covid च्या नव्या व्हेरिएंटचा धूमाकुळ; शास्त्रज्ञांकडून धोक्याची घंटा
Published on : 27 November 2021, 2:01 am

By
टीम-ईसकाळ

यूरोप तसेच आफ्रिकन देशात जो कोरोनाचा (corona new variant) उद्रेक झालाय त्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येतेय. कारण फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, जर्मनी, पोर्तूगाल, इंग्लंडमध्ये कोरोनाची तिसरी लाट (third wave of corona) धडकलीय. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने या ठिकाणी धुमाकुळ घातला असून तो अधिक घातक असल्याचे रिपोर्ट आहेत. त्याबाबत शास्त्रज्ञांनी या पूर्वीच धोक्याची घंटा वाजविली होती. नवा व्हेरिएंट अधिक घातक असल्याचे रिपोर्टएक नवीन, संभाव्यतः कोरोनाव्हायरसचा प्रकार, जो वेगाने पसरत आहे. त्याबाबत शास्त्रज्ञांनी धोक्याची घंटा वाजविली होती. अनेक देशांत प्रवास बंदी लादण्यात आल्या असून आर्थिक बाजारपेठा डबघाईला येत आहेत, कारण जगाला साथीच्या आजारावरून आणखी एक धक्का बसण्याची भीती होती. याच उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर काही देशांनी आणीबाणी जाहीर केलीय तर काहींनी शाळा, ऑफिसेस पुन्हा एकदा बंद केलीत. आफ्रिकेतल्या सहा देशातून येणाऱ्या विमानांवरही बंदी घालण्यात आलीय. B.1.1.529 असं कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं नाव असून तो अधिक घातक असल्याचे रिपोर्ट आहेत. विशेष म्हणजे हा नवा व्हेरिएंटनं त्या देशात धूमाकुळ घातलाय जिथं लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. म्हणजेच कोरोनाच्या व्हेरिएंटला रोखण्यात लस अपयशी ठरतेय.