Rain Updates : मान्सूनच्या निरोपाआधीच पावसाने झोडपले; ४ दिवस राहणार गडगडाट

in #yavatmal2 years ago


मुंबई : काल (शुक्रवार) सायंकाळी पावसाने राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची धांदल उडाली. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणी आले होते. यामुळे शहरातील भागांत वाहतुककोंडी झाली होती. तर येणाऱ्या चार दिवसांत मध्यम सरींचा अंदाज असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. (Maharashtra Rain Updates)
दरम्यान, महाराष्ट्रातून ५ ते १० ऑक्टोबर दरम्यान मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली असून याचवेळी पावसाकडून राज्यातील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासहित अनेक ठिकाणी जोरदार बॅटिंग करण्यात येत आहे. तर दोन दिवसांपूर्वी मराठवाड्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.