सेम स्पॉट, सेम ट्रॅक्टर, दोन अपघात, दोघे ठार! नंदुरबारमधील थरारक घटना

in #yavatmal2 years ago


एकाच स्पॉटवर एकाच दिवशी एकाच ट्रॅक्टरला धडकून दोन दुचाकीस्वार ठार झाले! दुसरा अपघात रोखता आला असता, पण...
जितेंद्र बैसणे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार : नंदुरबारमध्ये (Nandurbar Accident) एकाच ठिकाणी दोन अपघात झाले. या अपघातामुळे दोघा दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागलाय. एकाच ठिकाणी ट्रॅकर आणि दुचाकीचा (Tractor Bike Accident) अपघात झाला. पहिल्या अपघातानंतर अपघातग्रस्त ट्रॅकर हटवण्यात आला नव्हता. तोच थोडा वेळ गेल्यानंतर आणखी एक दुचाकीही ट्रॅक्टरला येऊन धडकली. त्यामुळे एका मागोमाग एक झालेल्या दोन अपघातात दोघांचा मृत्यू (Two biker killed) झाला.

Sort:  

nitesh bhau parnde like my news