Yavatmal News : खेकडे पकडणे जीवावर बेतले; पुढे घडलं असं काही...
यवतमाळ : खेकडे व मासे पकडण्यासाठी जामवाडी ते हेटी मार्गावरील नाल्यावर गेलेल्या दोन तरुणांचा शेतातील विजेचा शॉक बसल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री घडली असून या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. छत्रपती अजाब काळे ( वय २५), श्रावण लक्ष्मण गारपगारे ( वय २८) दोघेही (रा. बोरज) अशी मृतांची नावे आहे.दोघेही रात्री खेकडे आणि मासे पकडण्यासाठी जामवाडी ते हेटी नाल्यावर गेले होते. परंतु काही अंतरावर जातानाच त्यांना दशरथ झुनबाजी कालीकार यांच्या शेतामध्ये आणि नाल्यामध्ये जिवंत विद्युत तार असल्याने या दोघांनाही विद्युत तारेचा स्पर्श झाला. दोघांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.