Lumpy Skin : यवतामाळ जिल्ह्यातील दहा तालुक्यांत प्रादुर्भाव

in #yavatmal2 years ago

यवतमाळ : जिल्ह्यासह सर्वत्र सध्या पशुधनावर लम्पी स्कीन (Lumpy Skin Disease) आजाराने आक्रमण केले असून, या आजाराच्या संक्रमणामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील दहा तालुके लम्पी स्कीन आजाराने बाधित झाले आहेत. संसर्ग कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण (Lumpy Vaccination) करण्यावर भर दिला जात आहे. लम्पी स्कीन आजारामुळे एकाही पशुधनाचा (Livestock) मृत्यू झालेला नाही.

Also read:
Lumpy Vaccination : बरंजळा लोखंडेत ४६५ जनावरांना ‘लम्पी स्कीन’चे लसीकरण
लम्पी स्कीन आजारामुळे आतापर्यंत बाभूळगाव, झरी जामणी, घाटंजी, यवतमाळ, पुसद, महागाव, उमरखेड, पांढरकवडा, दारव्हा, मारेगाव हे दहा तालुके बाधित झाले आहेत. नायगाव, मुकुटबन, देमाडदेवी, मांगी, उमरसरा, बरबडा, देवगव्हाण, कासोला, अकोला बाजार, जवळा, लोणी, कोळंबी, कारेगाव, बेचखेडा, साखरा, राहूर, शिरोली, वाढोणा, वडवत, गणेशपूर, वेगाव, पाटण, पारडी, भारी, खानगाव, बोथबोडन, चांदपूर, तरोडा, नवरगाव, आमणी (ख), धानोरा, मारेगाव जळका, बोरीसिंह, तळेगाव, पाटपांगरा, करंजी, वाघरटाकळी, बिलायता या गावांतील पशुधन लम्पी स्कीनमुळे संक्रमित झाले आहेत.agrowon_2022-09_f85cb226-afd5-4d71-b379-1ba5b79e77be_News_Story___2022_09_05T075222_510.png