Deepveer : लग्नाच्या 4 वर्षांनंतर दीपिका रणवीरच्या नात्यात उडाले खटके? व्हायरल ट्विटमुळे चाहते हैराण

in #yavatmal2 years ago

मुंबई, 29 सप्टेंबर : बॉलिवूडचे बाजीराव आणि मस्तानी म्हणजेच अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण. दोघांनी 2018मध्ये इटलीमध्ये लग्न केलं. 6 वर्षांच्या अफेअरनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या लग्नाची सर्वत्र प्रचंड चर्चा झाली होती. इतकंच काय तर लग्न झाल्यापासून दीपिका आणि रणवीर सातत्यानं सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असतात. दोघांच्या नात्याच्या सतत चर्चा सुरू असतात. दोघांचं फोटोशूट असो किंवा एकमेकांवरील प्रेम व्यक्त करणं असो. दरम्यान दोघांच्या नात्यात खटके उडल्याची माहिती समोर आली आहे. रणवीर आणि दीपिका यांच्यात नात्यात काही तरी प्रोब्लेम आहे असं ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्रेकिंग! #deepikapadukone आणि #ranveersingh यांच्यात सगळं काही ठिक नाही असं लिहिलेलं ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचप्रमाणे त्याचबरोबर एक व्हिडीओ देखील जोडण्यात आला आहे. रणवीर नुकताच एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. ज्यात त्याला त्याच्या आणि दीपिकाच्या नात्याबद्दल प्रश्न विचारले गेले. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये रणवीर म्हणतोय, टचवुड, 2012पासून आम्ही एकमेकांबरोबर डेटिंग सुरू केली. या वर्षी 2022मध्ये मला आणि दीपिकाला एकत्र येऊन 10 वर्ष झाली आहेत.1658247372_deepika-ranveer-16582473723x2.jpg