धक्कादायक! 50 लाखांची खंडणी न दिल्यास जिवे मारू; नक्षलवाद्यांचे व्यावसायिकाला धमकीचे पत्र

in #yavatmal2 years ago

Yavatmal News Update : यवतमाळमधील घाटंजी शहरातील एका व्यावसायिकाला नक्षलवाद्यांनी 50 लाख रूपयांची खंडणी मागितली आहे. खंडणीची रक्कम न दिल्यास कुटुंबातील सदस्याला जिवे मारू अशी धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी घाटंजी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्राच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आलीय.

यवतमाळ जिल्ह्यात काही तालुके नक्षलग्रस्त होते. परंतु, अनेक वर्षांपासून नक्षलग्रस्त कारवाया झाल्या नाहीत. त्यामुळेच शासन दप्तरी असलेले जिल्ह्यातील नक्षलवादग्रस्त तालुके रद्द करण्यात आले. परंतु, गडचिरोलीत नक्षल दलमच्या कमांडरने पत्र पाठवून घाटंजी शहरातील व्यावसायिकाला 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. खंडणी दिली नाही तर परिवारातील सदस्याला जिवे मारण्याची धमकीही दिली आहे. dcecf1425bcf740b679f00b5ee37d9b91659964197062328_original.jpg