मुलीने घरी फोन केला आणि म्हणाली, “बाबा, मला लवकर घरी घेऊन जा..” सासरी पोहोचण्यापूर्वीच..

in #yavatmal2 years ago

आई-वडील आपल्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात आणि तिचे सर्व लाड पुरवतात. लग्नात देखील मुलीचा बाप ढसाढसा रडतो आणि त्याची फक्त एवढीच इच्छा असते की मुलीने सासरी आनंदी राहावे. पण जर मुलीला सासरी त्रास होत असेल तर त्या बापाची काय अवस्था होत असेल? अशीच एक घटना मध्य प्रदेशातील इंदोरमधून समोर आली आहे, जिथे एक ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अजयभाई आपल्या कुटुंबासह राहतात.

कुटुंबात पत्नीसह आई-वडील आणि लहान भाऊ आहे. पत्नी टीना हिला अनेकदा सासू-सासरे आणि नातेवाईकांकडून त्रास होत होता. ते आपली सून टीना हिला वडील रामभाई यांच्या घरून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करत होते.

टीना म्हणाली की, “माझ्या माहेरची परिस्थिती खूप वाईट आहे. असे असताना माझे आई-वडील 5 लाख रुपये कसे जमवतील?” असा विचार करून तिने सासू आणि दिराला मनाई केली आणि सांगितले की, आपण कधीही आपल्या माहेरातून जास्तीचे पैसे आणणार नाही.

हे ऐकून दीर आणि सासू खूप संतापले आणि टीनावर त्यांनी राग काढायला सुरवात केली. ही घटना घडत असताना टीनाने तिच्या वडिलांना फोन केला आणि म्हणाली की, “बाबा, लवकर माझ्या सासरी या आणि मला घेऊन जा कारण इथे माझी सासू आणि माझा दीर मला मा’र’हा’ण करत आहेत. मला आता हा छ’ळ सहन होत नाही.

आपल्या मुलीच्या तोंडून हे शब्द ऐकून, वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली आणि आपल्या मुलीने किती सहन केले याचा विचार ते करत राहिले. त्यांच्या मुलीचा दो’ष असेल तर ते मुलीलाही खडसावतात आणि सासरच्यांचा दो’ष असेल तर त्यांना देखील ते सोडत नाहीत.

मुलीच्या सासरच्या मंडळींना भेटण्यासाठी आई-वडील अनवाणीच घरातून निघाले होते. संध्याकाळी मुलीच्या घरी पोहचायच्या आधीच फोन वाजला आणि त्यांची लाडकी मुलगी टीनाने या जगात नसल्याची बातमी त्यांना मिळाली. हे शब्द ऐकून त्यांना पुन्हा मोठा धक्का बसला.

सायंकाळी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृ’त’दे’ह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. पोलिसांना तपास करत असताना घटनास्थळावरून कोणतीही चिठ्ठी सापडली नाही. मुलीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, “सासू संतोषी आणि दीर विजय तिला खूप मा’र’हा’ण करायचे.”

मी जावई अजयशी बोलून त्याला भेटायला येईन असे सांगितले. त्यानंतर जावई अजयने दुपारी फोन केला. अजय म्हणाला की तो आता ट्रान्सपोर्टवर आहे आणि संध्याकाळी घरी पोहोचल्यावर बोलणार, मात्र रात्री टीना खोलीत बे’शु’द्ध अवस्थेत आढळून आली.

त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिचा मृ’त्यू झाला होता. पाच लाख रुपयांसाठी सासरच्या मंडळींनी मुलीचा छ’ळ केल्याचा आ’रो’प वडिलांनी केला आहे. टीनाच्या हातावर आणि पायावरही जखमा आहेत. या प्रकरणी पोलिसांनी श’व’वि’च्छे’द’न करून संपूर्ण प्रकरणाचा तपास केला आहे.PicsArt_10-03-22.42.56_resize_54-768x403.jpg