रक्तरंजित थरार; दारव्हा येथे उपनगराध्यक्षाच्या खुनातील आरोपीची भर रस्त्यात हत्या

in #yavatmal2 years ago

यवतमाळ(दारव्हा) : येथील माजी उपनगराध्यक्ष सुभाष दुधे यांच्या खुनातील आरोपीचा खून करण्यात आला.ही घटना शुक्रवारला सकाळी सव्वाअकरा वाजताच्या सुमारास घडली. संदीप तोटे असे मृतकाचे नाव आहे.

तीन वर्षांपूर्वी नवराञात पंचमीच्याच दिवशी सुभाष दुधे यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात संदीप हा आरोपी आहे. सध्या जामिनावर असून तो आई व बहीणीसोबत यवतमाळ मार्गावरील कोठारी काॅम्प्लेक्स समोरुन जात असतांना त्याच्यावर हल्ला करण्यात आला.

सुरुवातीला बंदुकीने गोळ्या झाडल्या व त्यानंतर त्याच्यावर तलवारीने मानेवर वार करण्यात आल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संदीपचा जागीच मृत्यू झाला. पोलीसांनी लगेच घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.aasedwsf_202209890083.jpg