गाेर सेना आक्रमक; सभा स्थळावरुन आमदार इंद्रनील नाईकांची माघार

in #yavatmal2 years ago

पुसद (यवतमाळ) : श्याम राठोड (shyam rathod) यांचा खून करण्या-यांवर कठोर कारवाई करावी. त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी तसेच कुटुंबातील व्यक्तीस शासकीय नोकरीत घ्यावे या मागणीसाठी गोर सेनेच्या (gor sena) माध्यमातून आज पुसद (pusad) येथे महा आक्रोश मोर्चा (maha aakrosh morcha) काढण्यात आला. दरम्यान सभास्थळी आमदार इंद्रनील नाईक आले असता आंदाेलकांनी जाेरदार घाेषणाबाजी करीत त्यांना तेथून परतावून लावले. तगड्या पाेलिस बंदाेबस्तात निघालेला आजचा माेर्चा शांततेत पार पाडला.काळीदौलत येथील श्याम राठोड या युवकाचा तीन डिसेंबरला खून झाला होता. या गुन्ह्यातील सहाही आरोपींना अटक झाली आहे. पाेलिस अधीक्षकांनी गोर सेनेस जमावबंदी असल्याने माेर्चा काढू नये असे आवाहन केले हाेते. मागण्यांच्या पुर्ततेसाठी माेर्चा काढणारच असा पवित्रा गाेरे सेनेने गुरुवारी घेतला हाेता. त्यामुळे कालपासूनच पदाधिकाऱ्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली हाेती. परिणामी आज मोर्चा निघणार का असा प्रश्न उपस्थित झाला हाेता. परंतु सकाळी काही क्षणांत पुसद येथे हजारोंच्या संख्येने माेर्चक-यांनी शहरात धडक दिली.saamtv_2021-12_9649ecc3-e2ad-4534-b3ca-e0f18219f21c_Saam_Templet_Banner_new___2021_12_17T154617_003.jpg