या रे या..', शिंदे गटाने भरले 10 कोटी रुपये रोख, 1700 लालपरी बूक, 2 दिवस लागले पैसे मोजायला

in #yavatmal2 years ago

मुंबई, 04 ऑक्टोबर : दसरा मेळाव्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटामध्ये गर्दी जमवण्यासाठी चांगलीच शर्यत रंगली आहे. राज्यभरातून समर्थकांना मुंबईत आणले जात आहे. शिंदे गटाने समर्थकांना आणण्यासाठी तब्बल 1700 एसटी बसेसचं बुकिंग केल्याचं समोर आलं आहे. यासाठी तब्बल 10 कोटी रुपये रोख भरले असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेनेला टक्कर देत शिंदे गट मुंबईतील बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेत आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. शिंदे गटाकडून राज्यभरातून समर्थकांना मुंबईत आणले जात आहे. दसरा मेळाव्यामुळे एसटी महामंडळाला सोन्याचे दिवस आले आहे. शिंदे गटाकडून तब्बल 1700 हून अधिक लालपरी बसेसचं बुकिंग करण्यात आले आहे. यासाठी शिंदे गटाने तब्बल १० कोटी रुपये रोख भरले आहे. ही रक्कम मोजण्यासाठी रविवार आणि सोमवार असे दोन दिवस लागले होते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दसऱ्याला प्रथमच इतकी मोठी बुकिंग एसटी महामंडळात झाली आहे.

(गिरीश महाजन म्हणतात 'आम्ही खूप प्रयत्न केले, पण शेवटी रामदास आठवलेंमुळेच भाजप सत्तेत आलं')

दरम्यान, मुंबईच्या बीकेसी मैदानावर बुधवारी शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याकरिता वर्धा जिल्ह्यातूनही बसने कार्यकर्ते रवाना झाले आहे. जिल्ह्याच्या आठ तालुका मिळून एकूण 12 बस मुंबईला रवाना करण्यात आल्या आहे. वर्धेच्या शिंदे गटाच्या कार्यालयासमोरून सकाळी बसला झेंडा दाखवून रवाना करण्यात आले आहे.मुंबई येथे शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून मेळावे आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्याना दोन्ही गट आपले शक्ती प्रदर्शन करत आहे. शिंदे गटाकडून जिल्ह्यातून बसने कार्यकर्ते मुंबईला पाठविण्यात आले आहे मात्र उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून जिल्ह्यात कोणत्याही हालचाली दिसत नाहीय.

shinde444.jpg