Sada Sarvankar: शिवसेना-शिंदे गटातील संघर्षानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, आमदार सदा

in #yavatmal2 years ago

दादरमध्ये शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या संघर्षानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांचं परवाना असणारं पिस्तूल दादर पोलिसांनी जप्त केलं आहे. दादर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याच्या आरोपाखाली सदा सरवणकर यांच्याविरोधात रविवारी शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायदयांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली असून, जप्त करण्यात आलेलं पिस्तूल फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात येणार आहे.