Gujarat : अंबाजी दर्शनासाठी जाणाऱ्या 12 भाविकांना कारनं चिरडलं; 6 जणांचा जागीच मृत्यू

in #yavatmal2 years ago

Gujarat Accident News : गुजरातमध्ये भरधाव कारनं 12 भाविकांना चिरडलंय. यातील सहा भाविकांचा जागीच मृत्यू झालाय. यातील बहुतांश भाविक पंचमहाल जिल्ह्यातील कालोल येथील रहिवासी असून ते अंबाजी दर्शनासाठी (Ambaji Temple Gujarat) पायी जात होते.या घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि जखमी भाविकांना रुग्णालयात नेलं. गाडीची स्थिती पाहूनच अपघाताचं गांभीर्य लक्षात येईल. कारच्या पुढील भागाचं पूर्णपणे नुकसान झालंय. गुजरातचे अंबाजी मंदिर हे शक्ती, भक्ती आणि श्रद्धा यांचा संगम असल्याचं म्हटलं जातं. या देवीच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक