महिलेला मारहाण करणं राज ठाकरेंना तरी पटेल का? आरोपी मनसे पदाधिकारी म्हणाला…

in #yavatmal2 years ago

मुंबईत मुंबादेवीमध्ये गणपती मंडपाजवळ पक्षाचा फलक लावण्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याने एका महिलेला ढकलून देत मारहाण केल्याची चित्रफीत प्रसारित झाली. विनोद अरगिळे असं आरोपीचं नाव आहे. ते मनसेचे उपविभाग अध्यक्ष आहेत. या मारहाणीवरून अरगिळेंवर जोरदार टीका होत आहे. यानंतर विनोद अरगिळेंना महिलेला मारहाण करणं राज ठाकरेंना तरी पटेल का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.