नगर-आष्टी रेल्वेमार्ग लोकार्पण सोहळ्यात पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “गोपीनाथ

in #yavatmal2 years ago

बीडमध्ये आज नगर-आष्टी रेल्वेमार्गाचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजपा नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे उपस्थित होत्या. या रेल्वेमार्गाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाते, असे पंकजा मुंडे भाषणादरम्यान म्हणाल्या आहेत. बीड लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले होते. हे आश्वासन आज पूर्ण झाल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. या रेल्वेमार्गाला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याची मागणी करणार नाही, असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.