बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीचं फोटो शुट, Photo पाहून चाहते थक्क

in #yavatmal2 years ago

मुंबई : बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक दिग्गज अभिनेत्यांच्या मुलींच्या ग्लॅमरस लुकची नेहमीच चर्चा असते. यामध्ये जान्हवी कपूर, खुशी कपूर, शनाया कपूर, अनन्या पांडे, अथिया शेट्टी या अभिनेत्री अथवा स्टारकिडची असतात. मात्र प्रथमच आता एका बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची चर्चा सुरू आहे. ही चर्चा होण्याचे कारण म्हणजे फोटोशूट. नेमकं या फोटोशूटमध्ये तिने काय केले आहे ते जाणून घेऊयात. बॉलिवूड अभिनेता संजय कपूर (Sanjay Kapoor) सध्या बॉलिवूड पासून दुर आहे. मात्र एक काळ असा होता ज्यावेळेस बॉलिवूडमध्ये त्याची चर्चा व्हायची. आता सध्या त्याची मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor) चर्चेत असते. त्यात आता त्याची पत्नी महिप कपूर देखील चर्चेत आली आहे. महिप कपूर (Maheep Kapoor) केलेल्या एका फोटोशुटमुळे ती चर्चेत आली आहे.

संजय कपूरची (Sanjay Kapoor) पत्नी महीप कपूरने (Maheep Kapoor) आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केली आहेत. ज्यामध्ये ती खुपच ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोची बॉलिवूडमध्ये एकच चर्चा सुरु झाली आहे. फोटोमध्ये महीप कपूरने (Maheep Kapoor) लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. यासोबतचट तिने आलिशान दागिने देखील घातले आहेत. या लाल लेहेंग्यात आणि दागिन्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. तसेच फोटोंमध्ये महीप कपूर (Maheep Kapoor) खूपच किलर लूक देताना दिसत आहे. महीप कपूर (Maheep Kapoor) या आउटफिटमध्ये इतकी सुंदर दिसतेय की तिने मुलगी शनाया कपूरलाही मागे सोडले आहे.

दरम्यान महीप कपूरच्या (Maheep Kapoor) फोटोंची खुपच चर्चा आहे. या फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.

528245-maheep-kapoor.jpg