नाशिक-पुणे महामार्गावर अपघातात महाविद्यालयीन तरुणी ठार

in #yavatmal2 years ago

नाशिक-पुणे महामार्गावर महाविद्यालयीन तरुणी ठारस्कुटी वरून येणाऱ्या तीन मैत्रिणी उभ्या टेम्पोवर धडकल्या; दोघी गंभीर जखमीसकाळ वृत्तसेवा सिन्नर (जि. नाशिक) : आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावर नांदुर-शिंगोटे शिवारात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोवर दुचाकी धडकून झालेल्या अपघातात 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणी ठार झाली तर तिच्यासोबत स्कुटी वरून प्रवास करणाऱ्या दोघी मैत्रिणी गंभीर जखमी झाल्या आहेत.साक्षी अनिल खैरनार (१८) राहणार चास ता. सिन्नर असे या अपघातात मृत पावलेल्या विद्यार्थिनींचे नाव आहे. स्कूटी क्रमांक एमएच 15 / एचएल 1479 वरून संगमनेर येथून नांदुरशिंगोटेकडे येत असताना खंडोबा टेकडी जवळ महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर ट्रक क्र. एचआर 61 / डी 9843वर स्कुटी धडकली. या अपघातात साक्षी चा जागेवरच मृत्यू झाला. तर तिच्यासोबत प्रवास करणाऱ्या सविता सूर्यभान सांगळे रा. चास, वर्षा सुभाष जगताप रा. सोनेवाडी या दोघी गंभीर जखमी झाल्या. या अपघाताची माहिती मिळाल्यावर नांदुर-शिंगोटे दूर क्षेत्रातील पोलीस.... कर्मचारी तसेच स्थानिक तरुणांनी धाव घेतली जखमी अवस्थेतील तीनही तरुणींना संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच साक्षी चा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर रात्री उशिरा येथे साक्षी वर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर सविता व वर्षा या दोघींची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरा वावी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.Box...अपघातात मृत झालेली साक्षी व जखमी झालेल्या सविता, वर्षा या तिघी एकाच वर्गात शिक्षण घेत होत्या. एकाच रस्त्यावर तिघी वास्तव्याला असल्याने त्या नेहमी सोबत असायच्या. दोडी येथील महाविद्यालयात बारावीची परीक्षा त्यांनी दिली होती. पुढील शिक्षणासाठी पात्रता परीक्षा द्यायची असल्याने त्यांनी एकत्रित संगणमेर येथे क्लास लावला होता. त्यासाठी दररोज एकाच दुचाकीवरून त्या ये जा करायच्या. या अपघातामुळे चास परिसरात शोककळा पसरली आहे.[अपघातात मृत झालेली साक्षी व जखमी झालेल्या सविता, वर्षा या तिघी एकाच वर्गात शिक्षण घेत होत्या. एकाच रस्त्यावर तिघी वास्तव्याला असल्याने त्या नेहमी सोबत असायच्या. दोडी येथील महाविद्यालयात बारावीची परीक्षा त्यांनी दिली होती. पुढील शिक्षणासाठी पात्रता परीक्षा द्यायची असल्याने त्यांनी एकत्रित संगमनेर येथे क्लास लावला होता. त्यासाठी दररोज एकाच दुचाकीवरून त्या ये जा करायच्या. या अपघातामुळे चास परिसरात शोककळा पसरली आहे.Picsart_22_05_28_21_34_32_141.jpg