न्यूझीलंडच टेन्शन वाढलं! दोन दिवसात दुसरा मॅचविनर दुखापतग्रस्त

in #yavatmal2 years ago

मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्ग्युसनची दुखापत गंभीर नाही. परंतु, मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे तो गेल्या वर्षीच्या टी20 विश्वचषकाला मुकलेला. आम्ही यावेळी त्याची योग्य काळजी घेत आहोत. स्टीड यांनी हे देखील सांगितले की, टी20 विश्वचषकाआधी तंदुरुस्ती परत मिळवण्यासाठी लॉकी संपूर्ण तिरंगी मालिका खेळणार नाही.

लॉकी फर्ग्युसनची दुखापत ही आधीच दुसरा वेगवान गोलंदाज ऍडम मिल्नेच्या तंदुरुस्तीबाबत आधीच चिंतेत असलेल्या न्यूझीलंड संघासाठी मोठा धक्का मानला जातोय. त्यामुळे आता न्यूझीलंड संघाकडे केवळ टीम साऊदी आणि ट्रेंट बोल्ट ही अनुभवी जोडी पर्याय आहे.

न्यूझीलंड संघाचा उपकर्णधार मिचेल सॅंटनर, डेरिल मिचेल व ऍडम मिल्ने हे तीन प्रमुख खेळाडू यापूर्वी दुखापतग्रस्त झाले आहे. न्यूझीलंड संघाला विश्वचषकापूर्वी या तिघांनी तंदुरुस्त होण्याची आशा असून, ते त्यांना योग्य ती विश्रांती देखील देत आहेत.

टी20 विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघ-

केन विल्यमसन (कर्णधार), टिम साउदी, ईश सोधी, मिचेल सँटनर, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, डॅरिल मिशेल, ऍडम मिल्ने, मार्टिन गप्टिल, लॉकी फर्ग्युसन, डेव्हॉन कॉनवे, मार्क चॅपमन, मायकेल ब्रेसवेल, ट्रेंट बोल्ट, फिन एलन.nz-team.jpg

Sort:  

Bhai aap ka like power kam ho gai hai aap 2 din ke liye like na kare kewal post upload karo bas