Udayanraje Bhosale : डोळे पाणावल्यानं उदयनराजे हतबल? खासदारकी सोडण्याबाबत केलं महत्वाचं विधान

in #yavatmal2 years ago

bhushan_esakal___2022_11_28T163535_079.pngराज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. यादरम्यान प्रवक्त्याच्या वक्तव्यानंतर भाजपकडून शिवरायांचा अपमान झाल्याचं नाकारण्यात आलं होतं. दरम्यान आज या प्रकरणी खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली, यादरम्यान ते भावुक झाल्याचे देखील पाहायला मिळाले.

डोळ्यात अश्रू ही हतबलता समजायची का?तुमच्या डोळ्यात आता अश्रू आले होते, ही तुमची हतबलता समजायची का, की तुम्ही अश्रु गाळता असा प्रश्न उदयनराजे भोसले यांना विचारण्यात आला, या प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले की, तसं समजा.. माझा उलटं तुम्हाला प्रश्न आहे, भावना फक्त तुम्हाला दिल्या आहेत का? आम्हाला नाहीयेत का? हे काय मगरीचे अश्रू होते का? असे उदयनराजे यावेळी म्हणाले.फडणवीस राज्यपाल आणि भाजप प्रवक्त्यांचं समर्थन करतात यावर प्रतिक्रिया विचारली असता, उदयनराजे म्हणाले की, मी जे बोलायचं होतं ते बोललो. त्यांचं समर्थन मी तरी केलं नाही. कुठला पक्ष या लोकांविरोधात भूमिका घेत नसेल तर तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेऊच नका, असेही उदयनराजे म्हणाले.हेही वाचा - काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली?

उदयनराजे खासदारकीचा राजीनामा देणार?राज्यपालांना पदमुक्त केलं गेलं नाही तर तुमच्या खासदारकीचा राजीनामा देणार का? या प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले की, ती त्या वेळची गोष्ट आहे, काय होईल काय नाही होणार ते पाहून मी त्यावेळी निर्णय घेईल. माझी भूमिका मी बदलत नाही. कुठल्याही राजकारणासाठी मी त्यापासून फारकत घेणार नाही, असे उदयनराजे यावेळी म्हणाले.तसेच, तीन डिसेंबर रोजी राडगडावर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती देखील उदयनराजे यांनी यावेळी दिली. रायगडावर जाऊन लोकांच्या भावना व्यक्त करणार असे ते म्हणाले आहेत.
हेही वाचा: Veer Savarkar : 'सावरकरांवर बोलयाची लायकी आहे का...'; राज ठाकरेंचा राहुल गांधींना संतप्त सवाल

दरम्यान या प्रकरणी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती यांची भेट घेणार असून ते प्रोटोकॉल प्रमाणे ते कारवाई करतील. त्यांनी असं वक्तव्य केलं हे दुर्दैवी आहे. यानंतर कारवाई झाली नाही तर लोकांनी पुढं ठरवावं की कोणाबरोबर राहायचं किंवा नाही राहायचं असेही उदयनराजे यावेळी म्हणाले. तीन तारखेनंतर मी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची भेट घेणार आहे आणि त्यानंतर काय होतंय त्यावर मी नंतर बोलीन असे उदयनराजे म्हणाले.