Sonali Phogat : सोनाली फोगाट मृत्यूचा तपास आता गोवा पोलिसांकडून सीबीआयकडे

in #yavatmal2 years ago

नवी दिल्ली : अभिनेत्री आणि भाजपच्या पदाधिकारी सोनाली फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास आता सीबीआयनं गोवा पोलिसांकडून आपल्याकडे घेतला आहे. गोवा पोलीस योग्य प्रकारे तपास करत नसल्यानं तो सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी फोगाट कुटुंबियांनी केली होती. त्यांच्या इच्छेनुसार हा तपास आता सीबीआयकडे देण्यात आला आहे. गोव्यातील एका हॉटेलमध्ये सोनाली फोगाट यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. (Sonali Phogat death CBI takes over case from Goa Police)

एएनआयनं सूत्रांच्या हवाल्यानं वृत्त देताना म्हटलं की, वरिष्ठ सीबीआय अधिकाऱ्यानं हे खात्रीलायक सांगितलंय की, आम्ही या प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा: Mundra Drug case : 3,000 किलो ड्रग्ज जप्ती प्रकरणी NIAकडून आणखी तिघांना अटक

दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी म्हटलं होतं की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आपण ही केस सीबीआयकडे देण्याबाबत विनंती करणार आहोत. त्यानंतर १२ सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्रालयानं सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणं सीबीआयकडं देण्याची शिफारस केली होती.
हेही वाचा: फक्त १ रुपयात इडली! तीस वर्षांच्या 'ती'च्या सेवेला मुख्यमंत्र्यांचा सलाम

तत्पूर्वी, सोनाली फोगाट यांच्या मुलीनं आपण गोवा पोलिसांच्या तपासावर समाधानी नसल्याचं म्हटलं होतं. गोवा पोलिसांकडून या प्रकरणाचा अपेक्षित वेगानं तपास होत नसल्याचा आरोप करत हा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे पत्राद्वारे फोगाट यांच्या कुटुंबियांनी केली होती.

Sort:  

खबरों पर बहुत ही कम लाइक और कमेंट मिल रहे हैं जिसके कारण हम आगे नहीं बढ़ पा रहे हैं तो आप से निवेदन है सभी की खबरों को ज्यादा से ज्यादा लाइक करें कमेंट करें