Navratri 2022: 'मन कस्तुरी रे'चा दरवळ! अभिनय-तेजस्वीच्या प्रेमाचा गंध...

in #yavatmal2 years ago

Navratri 2022: 'मन कस्तुरी रे'चा दरवळ! अभिनय-तेजस्वीच्या प्रेमाचा गंध...
Published on : 26 September 2022, 10:33 am

By
टीम इ सकाळ

Mann Kasture Re Marathi Movie: मराठी मनोरंजन विश्वात मनसोक्त मुशाफिरी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नवरात्रीच्या निमित्तानं एका चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा करण्यात आली आहे. नवरात्री म्हटलं की नवचैतन्य, जोश, उल्हास. हेच सुंदर वातावरण अधिकच बहारदार आणि रंगमय करण्यासाठी मुंबई मुव्हिस स्टुडिओज घेऊन आले आहे 'मन कस्तुरी रे'चे नवे पोस्टर. नवरात्रीच्या निमित्ताने हे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून यात तेजस्वी प्रकाश आणि अभिनय बेर्डे प्रेमाच्या रंगात दंग होऊन नाचताना दिसत आहेत. संकेत माने दिग्दर्शित 'मन कस्तुरी रे' येत्या ४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांचा मराठी सिनेमांसाठीचा रस वाढत असतानाच तेजस्वी प्रकाश हिने 'मन कस्तुरी रे' या मराठी सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. यानिमित्ताने तेजस्वीने सोशल मीडियावर नवरात्रीच्या शुभेच्छा देत आपल्या या पोस्टरबाबत खूप उत्सुक असल्याचे सांगितले. तिचा हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. मराठमोळ्या तेजस्वीची पहिल्यांदाच मराठी सिनेमातील दमदार झलक पाहायला सर्वच प्रेक्षकवर्ग आतुर असतानाच आता तेजस्वी प्रकाश आणि अभिनय बेर्डेचे नाचतानाचे एक जबरदस्त पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
RECOMMENDED ARTICLES

'काही नात्यांना नाव नसतं...'; म्हणत मृणाल कुलकर्णींनी शेअर केलेली पोस्ट चर्चेत
Mrinal Kulkarni: मृणाल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे,जी सध्या चर्चेत आली आहे. खऱंतर पोस्ट त्यांच्या नव्या सिनेमा संदर्भातली आहे. सिनेमाचं नाव जितकं कॅची आहे,तितकीच त्याची टॅगलाईन. सिनेमात एक परिपक्व कथा पहायला मिळणार हे सिनेमातील कलाकार पाहिले की लक्षात येईलच आपल्या.प
5 hours ago

नवरात्रीत काढा या नऊ रांगोळी...
रांगोळी मुख्यत्वे स्त्रियाच काढतात.
5 hours ago

यूपीमध्ये भीषण अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली पलटल्यानं ९ जणांचा मृत्यू
लखनऊ : ट्रॅक्टर ट्रॉली पण्यानं भरलेल्या तळ्यात उलटल्यानं ९ जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. या ट्रॉलीमधून ४६ जण प्रवास करत होते. यापैकी ३४ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. (Fatal accident in Uttar Pradesh 9 people died after tractor trolley overturned in Pond)
5 hours ago

Tanaji Sawant :आरक्षण संदर्भातील 'त्या' वक्तव्याच्या विरोधानंतर सावंतांची पहिली प्रतिक्रिया
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात मराठा आरक्षाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. यावरून अनेक संस्थांनी सावंतांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. सावंतांनी मराठा समाजच्या भावना दुखावल्या असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. या गोधळानंतर तानाजी साव
5 hours ago

हेही वाचा: Nikki Tamboli: निक्कीला पाहावं, शांत व्हावं!

पोस्टरमधील या दोघांची कमाल केमेस्ट्री प्रेक्षकांची सिनेमासाठीची उत्सुकता अधिकच वाढवत आहे. पोस्टरवरून ही एक सुंदर प्रेमकहाणी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या नवरात्रीत अभिनय आणि तेजस्वीच्या' मन कस्तुरी रे' चा सुगंध सर्वत्र दरवाळणार, हे नक्की! नितीन केणी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत, व्यंकट अत्तिली, मृत्यूंजय किचंबरे यांच्या आयएनइएनएस डायमेंशन एन्टरटेनमेंट ॲण्ड आर्ट्स निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माते ड्रॅगन वॅाटर फिल्म्सचे निशीता केणी आणि करण कोंडे आहेत. वितरणाचे काम युएफओ सिने मीडिया नेटवर्कने पाहिले आहे.
हेही वाचा: Trisha Krishnan: साधेपणातही 'मधाळ' वाटणारी 'त्रिशा'

Web Title: Mann Kasture Re Marathi Movie Release Date Viral Sanket Mane Director Love Story
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.