Jasprit Bumrah Replacement : शमी, चाहरच नाही तर उमरान, उमेश देखील रेसमध्ये? Published on : 29 September 2022, 3:27 pm

in #yavatmal2 years ago

Jasprit Bumrah Replacement : शमी, चाहरच नाही तर उमरान, उमेश देखील रेसमध्ये?
Published on : 29 September 2022, 3:27 pm

By
अनिरुद्ध संकपाळ

T20 World Cup 2022 Jasprit Bumrah Replacement : ऑस्ट्रेलियात होणारा टी 20 वर्ल्डकप अवघ्या काही दिवसांवर आला असताना भारतीय संघाला अजून एक मोठा धक्का बसला. पाठीच्या दुखापतीतून सावरत असलेल्या जसप्रीत बुमराहचे टी 20 वर्ल्डकप संघात नाव आल्यानंतर तो फिट झाला असा समज सर्वांचा झाला. मात्र ऑस्ट्रेलियाविरूद्ध फक्त दोन सामने खेळल्यानंतर बुमराहच्या पाठीच्या दुखापतीने उचल खालली. आधी रविंद्र जडेजा दुखापतीमुळे टी 20 वर्ल्डकपला मुकला तर आता जसप्रीत बुमराह देखील स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे वर्ल्डकपला मुकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जडेजा दुखापतीमुळे बाहेर गेल्यानंतर संघाचा समतोल बिघडला होता. तो परत मूळ पदावर आणण्यासाठी दोन मालिका जाव्या लागल्या. आता जसप्रीत बुमराहची रिप्लेसमेंट कोण अशी चर्चा सुरू झाली आहे. जसप्रीत बुमराहच्या गैरहाजरीत त्याच्या जागी वर्ल्डकपचे तिकीट मिळवण्यात फक्त मोहम्मद शमी आणि दीपक चाहर नाहीयेत तर उमेश यादव (Umesh Yadav) आणि युवा उमरान मलिक (Umran Malik) देखील रेसमध्ये आहेत.

हेही वाचा: Suryakumar Yadav : चौथ्या क्रमांकावर रूमाल टाकला, आता हलणार नाही! कैफची स्तुतीसुमने

मोहम्मद शमीमोहम्मद शमी हा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकप संघात स्टँड बायमध्ये होता. त्याची ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी देखील त्याची निवड झाली होती. मात्र कोरोना झाल्यामुळे तो मालिकेला मुकला. तो बुधवारी कोरोनामुक्त झाला आहे. तो सामना खेळण्यासाठी फिट आहे की नाही हा वेगळा विषय आहे. मात्र जसप्रीत बुमराहनंतर मोहम्मद शमीच भारताचा अनुभवी स्ट्राईक बॉलर आहे. त्याची सीम गोलंदाजी आणि यॉर्करवरील प्रभुत्व वाखाण्याजोगं आहे. त्यामुळे बुमराहच्या जागी पहिली पसंती मोहम्मद शमी असू शकतो.दीपक चाहरभारतीय संघातील उगवता अष्टपैलू खेळाडू म्हणून दीपक चाहरचे नाव घेतले जाते. तो देखील वर्ल्डकप संघाच्या स्टँड बाय मध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात दीपक चाहरला खेळण्याची संधी मिळाली. त्याने पॉवर प्लेमध्ये अर्शदीप सिंग सोबत भेदक मारा केला. दीपक चाहर देखील दुखापतीमुळे दीर्घकाळ संघातून बाहेर होता. मात्र आता तो मॅच फिट झाला आहे. त्याची फलंदाजी हा देखील एक प्लस पॉईंट आहे. मात्र भुवनेश्वर कुमार आणि तो एकाच धाटणीचे स्विंग बॉलर आहेत. त्यामुळे त्याच्या निवडीबाबत ही बाब त्याच्या विरूद्ध जाते.
RECOMMENDED ARTICLES

Charging Station : घरी चार्जिंग स्टेशन उभारल्यास करात सूट
नागपूर : महापालिकेने प्रदूषणमुक्तीसाठी शहरात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यावर भर दिला असून, नागरिकांसाठी अभूतपूर्व योजना जाहीर केली आहे. घरीच इलेक्‍ट्रिक वाहनासाठी चार्जिंग स्टेशन तयार केल्यास संबंधितांना मालमत्ता करात दोन टक्के सूट देण्याची घोषणा महापालिकेने केली. या योजनेचा लाभ घेण्य
Sep 30, 2022

निर्यातीसाठी भारताला अनुकूल स्थिती
अकोला : भारतातून आखाती देशांना प्रामुख्याने सागरी मार्गाने अन्नधान्य व वस्तूंची निर्यात होते. भारत संयुक्त अरब अमिरातीला मोठी निर्यात करतो. त्यासाठी लागणारे कंटेनर्स गेली दोन वर्षे कमी संख्येने उपलब्ध होते. आता कंटेनर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. २० फुटी कंटनर्ससाठी पूर्वी एक हजार १००
Sep 30, 2022

प्रश्न सुटत नसतील, तर खुर्चीचा उपयोग काय?
कणकवली : महामार्ग चौपदरीकरण पूर्ण होऊन तीन वर्षे झाली तरीही अजून सेवा रस्ते, भूसंपादन, गटारांची बांधकामे आदी प्रश्‍न जैसे थे आहेत. गेली दोन वर्षे त्‍याच त्या मुद्द्यांवर बैठका घ्याव्या लागत असतील तर तुमच्या खुर्चीचा उपयोग काय, तुमच्या खुर्चीचा कार्यभार आम्‍ही घेऊन प्रश्‍न सोडवत बसायचे का,
Sep 30, 2022
CM Eknath Shinde : शिंदे भाजपजवळ कसे गेले ते ईडीचे डायरेक्टरच सांगतील
रत्नागिरी : भाजपच्या राजवटीला कंटाळून एकनाथ शिंदे यांनीच एकेकाळी आवाज उठवला होता. जाचाला कंटाळून त्यांनी राजीनामाही दिला होता. त्यामुळे अशोक चव्हाण बोलले ते खरेच आहे. आत्ता जरी शिंदे भाजपजवळ असले तरीही फडणवीसांच्या विरोधात आकांडतांडव त्यांनीच केले होते. भाजपचा जाच कसा असतो, हे उघडपणे शिंदे
Sep 30, 2022
हेही वाचा: Jasprit Bumrah : बुमराह तो बुमराहच! शमी - चाहर त्याची जागा घेऊ शकणार?

उमरान मलिकउमरान मलिक हा भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज आहे. अनेक लोकं त्याला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपमध्ये खेळताना पाहू इच्छितात. मात्र त्याने भारताकडून आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये फारशी चमक दाखवली नव्हती. मात्र त्याच्याकडे असलेला वेग त्याचा प्लस पाईंट आहे. त्यामुळे तो या जोरावर निवडसमितीचे लक्ष वेधून घेऊ शकतो. जर उमरान मलिकची वर्ल्डकपसाठी निवड झाली तर ती एक वाईल्ड कार्ड एन्ट्री आणि सरप्राईज पॅकेज देखील ठरू शकते.उमेश यादवभारतीय संघाच्या संघव्यवस्थापनावर नजर टाकली तर उमेश यादव देखील वर्ल्डकप संघात येऊ शकतो. मोहम्मद शमी ज्यावेळी कोरोनाग्रस्त झाला त्यावेळी त्याची थेट रिप्लेसमेंट म्हणून उमेश यादवची निवड करण्यात आली होती. जर शमी अजून फिट झाला नसेल तर त्याला वर्ल्डकपचा जॅकपॉट लागू शकतो. कारण रोहित शर्माने ज्यावेळी शमीच्या जागी उमेश यादवची निवड केली त्यावेळी त्याने आम्ही कामगिरी आणि अनुभवाच्या जोरावर निवड करतो असे सांगितले होते. मग तो शेवटचा कधी खेळला होता, त्याचे वय का याचा विचार करत नाही.