IND vs SA T20 Live : टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पहिल्या T20 सामन्यात घातला धुमाकूळ

in #yavatmal2 years ago

Live
IND vs SA T20 Live : टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पहिल्या T20 सामन्यात घातला धुमाकूळ
Published on : 28 September 2022, 3:06 pm

By
किरण महानवर

India vs South Africa Live Score 1st T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मालिका दोन्ही संघांसाठी विश्वचषकाच्या तयारीसाठी उत्तम संधी आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा तीन सामन्यांच्या T20I मालिकेत 2-1 ने पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने भारतात अद्याप टी-20 मालिका गमावलेली नाही.

03:06 PM, Sep 28 2022
दक्षिण आफ्रिकेला 101 धावांवर आठवा धक्का, महाराज 41 धावांवर बाद
03:06 PM, Sep 28 2022
अक्षरने दक्षिण आफ्रिकेला दिला सातवा धक्का
दक्षिण आफ्रिकेला 16व्या षटकात 68 धावांवर सातवा धक्का बसला आहे. अक्षर पटेलने वेनला झेलबाद केले. वेन 37 चेंडूत 24 धावा काढून बाद झाला. त्याने आपल्या डावात एक चौकार आणि एक षटकार ठोकला. वेनने केशव महाराजसोबत सातव्या विकेटसाठी 47 चेंडूत 26 धावांची भागीदारी केली. सध्या महाराज आणि कागिसो रबाडा क्रीजवर आहेत.
RECOMMENDED ARTICLES

Oscar Award: RRR काय ऑस्करचा मुव्ही आहे का? दिग्दर्शकाची खोचक प्रतिक्रिया
RRR Oscar Nomination Movie: एस एस राजामौली यांच्या आरआरआरनं केवळ भारतातच नाहीतर जगभरामध्ये आपल्या नावाची वेगळी छाप उमटवली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं हजार कोटींची कमाई करुन पुन्हा एक वेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आरआरआर हा भारताकडून ऑस्करसाठी पाठविण्यात येणार असल्याची चर्चा सुर
5 hours ago

'मारायचा प्लॅन आहे का?', ऐश्वर्याला चाहत्याचा सवाल
ऐश्वर्यानं नवरात्रीनिमित्तानं पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये,माथ्यावर लाल रंगाची बिंदी लावत एक फोटो शेअर केला,ज्यावरनं चाहत्यांच्या नजरा हटत नाहीयत.
5 hours ago

Jasprit Bumrah Injury : T20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का, जसप्रीत बुमराह जखमी
Jasprit Bumrah Injury : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. टीमचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकदरम्यान सांगितले की, स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला पुन्हा दुखापत झाली आहे. तो मालिकेतील पहिला सामना खेळणार नाही. त्याची दुखापत कि
5 hours ago

Interview With Shweta Mahadik : सतत प्रेक्षकांच्या मनात राहणाऱ्या श्वेता महाडिकसोबत खास गप्पा
आपल्या उत्तम अभिनयासोबतच सोशल मीडियावर DIY व्हिडिओजमुळे सतत प्रेक्षकांच्या मनात राहणाऱ्या श्वेता महाडिकसोबत खास गप्पा.
6 hours ago
03:06 PM, Sep 28 2022
दक्षिण आफ्रिकेला आठव्या षटकात सहावा धक्का
दक्षिण आफ्रिकेला आठव्या षटकात 42 धावांवर सहावा धक्का बसला आहे. हर्षल पटेलने पहिल्याच षटकात एडन मार्करम अल्बडब्‍ल्‍यू आउट केले. मार्करमला 24 चेंडूत 25 धावा करता आल्या. मार्करमने आपल्या खेळीत तीन चौकार आणि एक चौकार मारला. यानंतर नवव्या षटकात अश्विनने मेडन षटक टाकले. नऊ षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची 6 बाद 42 धावा. वेन पारनेल आणि केशव महाराज सध्या क्रीजवर आहेत.
03:06 PM, Sep 28 2022
पॉवरप्ले भारताच्या नावावर
पॉवरप्ले भारताच्या नावावर राहिला आहे, कारण या सहा षटकात दक्षिण आफ्रिकेला केवळ 30 धावा करता आल्या आणि त्यांचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.

03:06 PM, Sep 28 2022
दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये
दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या षटकात पाचवा धक्का बसला. दीपक चहरने ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर त्रिस्टन स्टब्सला अर्शदीप सिंगकडे झेलबाद झाला. दक्षिण आफ्रिकेच्या चार खेळाडूंना खातेही उघडता आले नाही. तीन षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेच्या 5 बाद 14 धावा आहेत. वेन पारनेल आणि एडन मार्कराम सध्या क्रीजवर आहेत.

03:06 PM, Sep 28 2022
दुसऱ्या षटकात दक्षिण आफ्रिकेला तीन धक्के
दुसऱ्या षटकात दक्षिण आफ्रिकेला आणखी तीन धक्के बसले आहे. दीपक चहरनंतर अर्शदीप सिंगने धुमाकूळ घालत सहा चेंडूंत तीन विकेट घेतले आहेत. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अर्शदीपने क्विंटन डी कॉकला क्लीन बोल्ड केले. यानंतर पाचव्या चेंडूवर अर्शदीपने रिले रुसोला यष्टिरक्षक ऋषभ पंतकडे झेलबाद केले. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर अर्शदीपने डेव्हिड मिलरला क्लीन बोल्ड केले. दोन षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची अवस्था चार बाद आठ आहे.

03:06 PM, Sep 28 2022
पहिल्याच षटकात दक्षिण आफ्रिकेला धक्का
पहिल्याच षटकात एका धावसंख्येवर दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज दीपक चहरने ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर कर्णधार टेंबा बावुमाला क्लीन बोल्ड केले.
03:06 PM, Sep 28 2022
टीम इंडीयाच्या प्लेंइग 11
भारतीय : रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, आर अश्विन, दीपक चहर.

03:06 PM, Sep 28 2022
भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा घेतला निर्णय
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंत आणि अर्शदीपला संधी मिळाली आहे. त्याचवेळी जसप्रीत बुमराह अनफिट आहे. त्यांच्या जागी दीपक चहरला संधी देण्यात आली आहे. युझवेंद्र चहलही हा सामना खेळत नाही. त्याच्या जागी रविचंद्रन अश्विनचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे.

12:50 PM, Sep 28 2022
पहिल्या T20 मध्ये प्लेइंग-11 कसा असेल?
IND vs SA: टीम इंडीयाच्या प्लेंइग 11मध्ये मोठा फेरबदल, 'या' खेळाडूला मिळू शकते संधी - संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा